शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

रजेनंतरची ‘चोरवाट’ होणार बंद!

By admin | Published: April 09, 2016 3:52 AM

दीर्घ कारणामुळे रुग्णनिवेदन (सिक) रजा किंवा गैरहजेरीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर न होता परस्पर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याशी संगनमत करुन सोयीनुसार कर्तव्यावर हजर

मुंबई : दीर्घ कारणामुळे रुग्णनिवेदन (सिक) रजा किंवा गैरहजेरीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर न होता परस्पर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याशी संगनमत करुन सोयीनुसार कर्तव्यावर हजर होण्याची मुंबई पोलीस दलातील अधिकारी/अंमलदाराची ‘चोरवाट’आता लवकरच पूर्णपणे बंद होणार आहे. त्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना त्यासाठी पहिल्यांदा संबंधित पोलीस उपायुक्तांसमोर आवश्यक कागदपत्रानिशी उपस्थित रहावे लागणार आहे. त्यांच्या संमतीनंतरच त्यांना कर्तव्यावर हजर होता येणार आहे.खोटी कारणे दर्शवित सुट्टी उपभोगणाऱ्या पोलिसांना चाप बसवण्यासाठी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी त्याबाबत सूचना दिल्या आहेत. परिमंडळ-१ चे उपायुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी आपल्या कार्यश्रेत्रात त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. पोलीस दलात प्रामाणिक अधिकारी, अंमलदाराबरोबरच काही कामचुकार व पदाचा गैरफायदा घेणारेही आहेत. या गैरकृत्यांचा तसेच दांडी मारण्याचा फटका कर्तव्यदक्ष पोलिसांना बसतो. कसलाही आजार नसताना केवळ ड्युटी, महत्त्वाचा बंदोबस्त चुकविण्यासाठी काही जण ‘सिक’ रिपोर्ट करतात, किंवा वरिष्ठांच्या परवानगीशिवाय गैरहजर रहातात. त्यानंतर स्वत:च्या सोयीनुसार पुन्हा कर्तव्यावर हजर होतात. त्यासाठी डॉक्टरांशी संगनमत करुन प्रमाणपत्र मिळवितात, वास्तविक त्यांना पहिल्यादा संबंधित परिमंडळ/ शाखेतील पोलीस उपायुक्तांच्या समोर हजर होवून त्यांच्याकडून परवानगी घ्यावयाची असते. मात्र त्यांच्याकडून खरडपट्टी होण्याच्या भीतीने पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी /ड्यूटी कारकून किंवा सहाय्यक आयुक्ताशी ‘अर्थ’पूर्ण चर्चा करुन हजर होतात. संबंधित पोलीस उपायुक्ताची बदली झाल्यानंतर किंवा दीर्घ रजा अथवा प्रशिक्षणासाठी रवाना झाल्यानंतर त्याच्याऐवजी आलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्यांसमोर कागदपत्रे सादर करुन त्यांची मंजुरी घेतली जाते. नवीन उपायुक्ताला त्याच्या गैरहजरीमुळे इतर पोलिसांवर पडलेला ताण किंवा निर्माण झालेल्या अडचणीची कल्पना नसते, त्यामुळे ते त्यांची मागील काळातील रजा नियमित करुन देतात. असे प्रकार सर्रास घडत असल्याचे लक्षात आल्याने आयुक्तांनी त्याला पायबंद घालण्यासाठी रुग्णनिवेदन किंवा गैरहजेरीनंतर कर्तव्यावर येण्यासाठी आधी उपायुक्तांची परवानगी घेणे सक्तीचे केले आहे. त्यांच्याकडून योग्य ती मिमांंसा होणार असल्याने इतर गरजू अधिकारी/कर्मचाऱ्यांना सुट्टी व बंदोबस्तामध्ये सवलत मिळू शकणार आहे. परिमंडळ-१चे उपायुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी त्याबाबत हद्दीतील पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)