पिंपरी : कार्ला एकवीरा मंदिराच्या कळसाची चोरी ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेचा तपास २५ डिसेंबरपर्यंत न लागल्यास तो सीआयडीकडे देण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोºहे यांनी एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरीच्या तपासाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांच्या सूचनेनुसार आयोजित गृह विभागाच्या बैठकीत बोलताना गृहराज्यमंत्री केसरकर यांनी ही माहिती दिली. एकवीरा मंदिर ट्रस्ट अध्यक्ष व माजी आमदार अनंत तरे , गृह विभागाचे प्रधान सचिव सतीश बढे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक, लोणावळा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे आदी या बैठकीला उपस्थित होते. कार्ला देवस्थान ट्रस्टच्या काही विश्वस्तांना धमकावून त्यांना वाळीत टाकण्याचे निंदनीय कृत्य करणाºया व्यक्तींच्या विरोधात तत्काळ गुन्हे दाखल करा, असे आदेश केसरकर यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना दिले आहेत.शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आमदार डॉ. गोºहे यांनी सांगितले की, कार्ला देवीच्या मंदिरात असे प्रकार होणे ही अत्यंत क्लेशदायक घटना असून, याबाबत पोलिसांनी दाखविलेली दिरंगाई नजरेआड करता येणार नाही. सहायक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांनी याबाबत दिलेली माहिती अत्यंत विसंगत स्वरूपाची असून, यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
25 डिसेंबरपर्यंत कार्ला एकवीरा कळसचोरीचा तपास न लागल्यास सीआयडीकडे :दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 4:48 AM