लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : नऊ बळी घेणाऱ्या पांगरमल विषारी दारूप्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीचे पथक नगरमध्ये दाखल झाले आहे. तर या प्रकरणाला तीन महिने पूर्ण होत आल्याने चार दिवसांत सीआयडीकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे़ नव्याने केलेल्या तपासानुसार, आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ २३ एप्रिलला राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग केला़ कोल्हापूर सीआयडीचे अपर पोलीस अधीक्षक गणेश मोरे यांचे पथक हा तपास करीत आहे. सीआयडीचे विशेष पोलीस महा-निरीक्षक सुनील रामानंद यांनी शनिवार व रविवारी नगरमध्ये तळ ठोकत आढावा घेतला़
सीआयडी पथक नगरमध्ये दाखल
By admin | Published: May 09, 2017 2:10 AM