शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

चित्रपटसंग्रहालयाचे पी. के. नायर यांचे निधन

By admin | Published: March 05, 2016 3:57 AM

चित्रपटांचा चालता बोलता इतिहास असलेले आणि ‘सॅल्युलाईड मॅन’ अशी ओळख असलेले राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (एनएफएआय) संस्थापक व पहिले संचालक दिग्दर्शक पी. के. नायर यांचे शुक्रवारी येथे निधन झाले.

पुणे : चित्रपटांचा चालता बोलता इतिहास असलेले आणि ‘सॅल्युलाईड मॅन’ अशी ओळख असलेले राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (एनएफएआय) संस्थापक व पहिले संचालक दिग्दर्शक पी. के. नायर यांचे शुक्रवारी येथे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सूना व नातवंडे असा परिवार आहे. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.गेल्या आठवडाभरापासून आजारी असल्यामुळे नायर यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. एनएफएआयच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’, ‘कालिया मर्दन’ ‘बॉम्बे टॉकीज’ यांसारख्या अनेक जुन्या चित्रपटांसह ‘जीवननैया’, ‘बंधन’, ‘कंगन’, ‘अछूत कन्या’, ‘किस्मत’ यांसारखे काही दर्जेदार पण अडगळीत पडलेले चित्रपटही शोधून काढत त्यांनी ते जतन करण्याची मोलाची कामगिरी बजावली. चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून चित्रपटविषयक साक्षरता निर्माण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. परमेश कृष्णन नायर यांचा जन्म ६ एप्रिल १९३३ रोजी केरळ येथील तिरुअनंतपुरम येथे झाला. उमेदीच्या काळात त्यांनी चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती केली. तसेच काही पुस्तकांचे लेखनही केले. फिल्म इन्स्टिट्यूटटची १९६१ साली स्थापना झाली. तेव्हापासून नायर यांनी ग्रंथपाल म्हणून काम पाहिले. आपल्या कारकिर्दीच्या काळात अनेक पदे भूषवीत ‘एनएफएआय’ च्या संचालकपदापर्यंत ते पोहोचले. १९६४ साली स्थापन झालेल्या नॅशनल फिल्म अर्काईव्ह आॅफ इंडिया’ चे (एनएफएआय) पहिले संचालक होण्याचा मान त्यांना मिळाला. १९९१ साली ते या संस्थेतून संचालक पदावरून निवृत्त झाले होते. (प्रतिनिधी)