मुंबई : गृह विभागाने अलीकडे काढलेले परिपत्रक हे आधीच्या आघाडी सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच काढलेले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. ते म्हणाले की, लोकसेवकांवर टीका केली तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे या परिपत्रकात कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकारने कोणतीही गदा आणलेली नाही. पण परिपत्रक आणि त्यातून कायदेशीर भाषा समजून न घेताच सरकारवर टीका केली जात आहे. हे परिपत्रक मागे घेण्यात येणार नसल्याचे सांगून ते म्हणाले की उच्च न्यायालयाने सरकारला दिलेल्या आदेशाच्या चौकटीतच हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे. आता ते रद्द करायची मागणी करणाऱ्यांना ती मान्य करून घ्यायची असेल तर सर्वोच्च न्यायालयात ते दाद मागू शकतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले. जपान दौरामुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ८ ते १३ सप्टेंबरदरम्यान जपानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीत कोयासान येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच ते जपानमध्ये उत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीसाठी चर्चा करणार आहेत.
आघाडी सरकारच्या प्रतिज्ञापत्रावरूनच परिपत्रक
By admin | Published: September 06, 2015 12:52 AM