पुणे : जातीवाद, धर्माची सर्कस अजून संपलेली नाही. आजही जाती, धर्माच्या दहशतीखाली सत्ता गाजवली जात आहे. आपल्याला एका संकुचित विचारसरणीत अडकवून ठेवले जात आहे. याविरोधात आपल्याला एकजुटीने लढा उभारावा लागेल. ही अस्तित्वाची लढाई आहे. आरएसएस विरुद्ध सत्यशोधक रेझिस्टन्स ताकद उभी करावी लागेल, असे आवाहन लेखिका आणि ब्लॉगर अरुंधती रॉय यांनी एल्गार परिषदेत केले.
पुण्यात एल्गार परिषदेचे शनिवारी( दि. ३०) आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. रॉय म्हणाल्या,जात, पुरुषत्व, धर्म याबाबत सरकारच्या मनात खदखद आहे. त्यामुळे लव्ह जिहाद विरोधीसारखे शासन निर्णय मंजूर केले जात आहेत. मुस्लिमांची कत्तल हा त्यांचाच अपराध असे चित्र निर्माण केले जात आहे. तसेच एल्गार परिषद संविधानविरोधी काम करणारी नाही. शहरातील रस्त्यांवर दलितांवर खुलेआम अत्याचार, लोकांमध्ये नकारात्मकता पसरवणारे आपण नाही. एकविसाव्या शतकात संघ ब्राम्हणवादाचे नेतृत्व करत आहे. संसद त्यांच्या हातात आहे, ज्यांचे गोमूत्र हे आवडीचे औषध आहे. मोदींच्या रुपात दिल्लीच्या सत्तेवर बसले आहे.
मोदी काँग्रेसच्या वंशवादावर बोलताना दमत नाहीत, मात्र अंबानी, अदानी यांच्यासारख्या कॉर्पोरेट क्षेत्रातील घराणेशाहीला सढळ हाताने मदत करतात हा विरोधाभास आहे. त्याचप्रमाणे भाजपा जगातील सर्वाधिक श्रीमंत राजकीय पक्ष हिंदू राष्ट्रवादाच्या नावाखाली देशावर मालकी हक्क गाजवू पाहत आहेत. लपून वार करणे, दहशत निर्माण करणे, हुकूमशाही लादण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दात अरुंधती रॉय मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
ब्राम्हणवाद, भांडवलशाही आणि पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात 'एल्गार' करण्याची गरजजात, पुरुषत्व, धर्म याबाबत सरकारच्या मनात खदखद आहे. त्यामुळे लव्ह जिहाद विरोधीसारखे शासन निर्णय मंजूर केले जात आहेत. मुस्लिमांची कत्तल हा त्यांचाच अपराध असे चित्र निर्माण केले जात आहे.