- रमेश प्रभू
स्मार्ट सिटी ही संकल्पानाच जुन्या आणि नव्या शहरांना जोडणो या धर्तीवर आधारित आहे. जुन्या शहरांची मर्यादा लक्षात घेता नव्या शहरांचा जन्म होणो अपेक्षित असते. लोकसंख्या स्थलांतरित होताना त्यातून रोजगारनिर्मितीची साधने निर्माण होणो अपेक्षित असते. आणि स्मार्ट सिटी म्हटल्यानंतर या सर्व घटकांचा प्रामुख्याने यामध्ये अंतर्भाव होतो. विशेषत: नागरिकांचे जीवनमान सुधारणो, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून त्यांना अधिकाधिक पायाभूत सेवासुविधा उपलब्ध करून देणो हा यामागचा उद्देश असतो. म्हणूनच स्मार्ट सिटीची संकल्पना पुढे आली असून, त्याद्वारे राष्ट्राचा विकास होणो हे अभिप्रेत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेने शंभर स्मार्ट सिटी बनविण्यासाठी सरकारने आतापासून सुरुवात केली आहे. 2क्14 च्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी 7,क्6क् कोटी आर्थिक अनुदान पारित केले आहे. स्मार्ट सिटीची योजना ही फक्त ठरावीक राज्याच्या विकासाकरिता नसून, संपूर्ण भारतासाठी एक विकासात्मक योजना आहे; आणि जी भारताला अत्याधुनिक राष्ट्र बनवू शकते.
स्मार्ट सिटी या योजनेला एक ठरावीक व्याख्या नाही तर त्याची व्याख्या खूप विस्तृत आहे. स्मार्ट सिटी म्हटले की देशातल्या प्रत्येक शहराबरोबर त्यालगत असणारे प्रत्येक गाव आणि खेडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानात रूपांतर होणो होय. स्मार्ट सिटी या योजनेमध्ये सर्वात प्रमुख म्हणजे सर्वसामान्य जनता ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:ला सुसज्ज करेल आणि आपला विकास घडवून आणोल. स्मार्ट सिटी योजनेचा प्रमुख उद्देश हा उच्चस्तरीय शिक्षण, आरोग्य उपचार केंद्र, पक्क्या इमारती, दळणवळण आणि वाहतुकीची सोय, 24 तास पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा इत्यादी अत्यावश्यक गरजा या तंत्रज्ञानामुळे पूर्ण होऊन प्रत्येक राज्य एकमेकांना जोडून राहील, असा आहे. स्मार्ट सिटी ही योजना भारतासाठी नवीन नाही आणि या योजनेवर काही राज्यांनी आधीच काम करण्यास पाऊल उचलले आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. आणि ते यशस्वीरीत्या पार पाडत आहेत. महाराष्ट्र हे नावाप्रमाणोच एक मोठे राज्य आहे, जिथे अनेक शहरे, गाव-खेडी वसलेली आहेत. महाराष्ट्रात पुण्यामधले लवासा हे स्मार्ट सिटी योजनेचे उदाहरण आहे. तसेच महाराष्ट्रात नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर इत्यादी. अशी अनेक लहान-मोठी गावे आणि शहरे आहेत. या प्रत्येक गावात आणि शहरात स्मार्ट सिटी योजना राबविली जाऊ शकते. कारण महाराष्ट्र हे राज्य माहिती तंत्रज्ञानात खूप प्रगतीशील आहे आणि अजूनही प्रगतीपथावर जलद गतीने पुढे जात आहे. त्यामुळे प्रत्येक राज्य स्मार्ट सिटी होऊ शकेल. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबई, ठाणो, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर इत्यादी अनेक शहरे आहेत. यातील काही शहरांच्या पसरण्याच्या मर्यादा संपल्या आहेत. उदाहरणार्थ मुंबईसारखे शहर आता पसरू शकत नाही, तर ते इमारतींच्या माध्यमातून उंच वाढू शकते. आणि नाही म्हटले तरी त्या उंचीला देखील मर्यादा आहेत. उलटपक्षी मुंबई महानगर प्रदेशातील नवी मुंबईसारखे शहर आणखी पसरू शकते. मात्र नवी मुंबईची स्मार्ट सिटी करताना तो रूपांतरणाचा भाग होत असल्याने स्मार्ट सिटी यापेक्षा वेगळी आहे. स्मार्ट सिटीमध्ये सगळेच नव्याने उभे राहते. शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, आयटी पार्क, रोजगार आणि पायाभूत सेवा-सुविधा इत्यादींचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो. विशेषत: रस्ते हा स्मार्ट सिटीमधील महत्त्वाचा दुवा असतो वा ठरतो. कारण शहरातील रस्ते रुंद असतील तर शहराचे दळणवळण वेगाने होते. महत्त्वाचे म्हणजे व्यापाराला त्याचा अधिक फायदा होतो. आणि व्यापार आणखी वृद्धिंगत होतो. शिवाय स्मार्ट सिटी या एकमेकांना जोडल्या तर आणखीच फायदा होतो.
एकंदर शंभर दिवसांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही संकल्पना मांडली. ही संकल्पना मांडणो आणि अमलात आणण्यासाठी थोडा कालावधी लागेल. परंतु भविष्यात भारतातील प्रत्येक राज्य स्मार्ट सिटीच्या स्वरूपात उभारून येईल आणि भारत हे जगात एक अग्रेसर विकसित राष्ट्र होईल.
(लेखक महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.)