लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरातील अवैध व्यवसायांवर पोलिसांच्या वतीने जोरदार कारवाई सुरू केली आहे. विनापरवाना लॉटरी चालविणे, मटका चालविणे, दारूविक्री करणे, मसाज पार्लरच्या नावाखाली अवैध वेश्या व्यवसाय चालविणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी दिवसभरात वेगवेगळ्या गुन्ह्यात अकरा जणांना अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात बेकायदा वेश्या व्यावसाय व अवैध धंदे सुरू असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे उजेडात आणले होते. या प्रकाराची थेट पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दखल घेतली. त्यानंतर अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांनी जोरदार छापासत्र बुधवारी सुरू केले. त्यामध्ये भोसरीतील अनुष्का आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नवाखाली सेक्स रॅकेट चालवित असल्याचे प्रकरण उघडकीस आले असून, भोसरी एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यामध्ये तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.अलका अजय कदम (वय २७) असे अटक महिलाक्ष आरोपीचे नाव असून ती हे पार्लर चालवत होती. भोसरी येथील नाशिकरोड जय गणेशनगर येथील साईगंगा अपार्टमेंटमध्ये अनुष्का आयुर्वेदिक मसाज सेंटर चालू होते. मात्र, पोलिसांना आधीपासून यावर संशय होता. खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलिसांनी तेथे छापा टाकला. सर्व प्रकार उघडकीस आला. या वेळी तीन तरुणींना पोलिसांनी भोसरीतील चैतन्य महिला आश्रमात पाठवले असून आरोपी कदमला अटक केली आहे. संबंधित महिलेचे बावधनलाही मसाज सेंटर आहे. त्यानुसार या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येईल, असे भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी सांगितले.आळंदी रस्त्यावरील राहुल गार्डन पुणे येथे छापा टाकून ११२ देशी आणि विदेशी बनावटीचा सुमारे दीड लाखांचा मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी राहुल तुकाराम काटे (वय ३२, राहणार काटे चाळ) यांच्यासह सहा कामगारांना ताब्यात घेतले आहे.पिंपरी रेल्वे स्टेशन रस्त्यावरील हॉटेल किंग्ज जवळ पोलिसांनी कारवाई केली. त्या वेळी हर्षद सालमेन मंडल यांच्याकडे सुमारे बारा हजार रुपयांच्या मद्याच्या बाटल्या आढळल्या. तसेच वाकड येथील सहारा हॉटेल येथे विनापरवाना मद्यविक्री होत असल्याचे छाप्यात आढळून आले. याप्रकरणी सुभाष मांडेकर, वृषभ मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच भोसरी येथे छापा टाकून तीन जणांना अटक करून सुमारे साडेसहा हजारांचा माल हस्तगत केला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकड जकातनाका येथे एका दुचाकीस्वाराची झडती घेतली असता बेकायदा दारू आढळून आली.लॉटरीचालकावरही गुन्हागुन्हेशाखेच्या वतीने आळंदी रस्त्यावरील राज वाईन्सवर छापा टाकला असून रिंकेश बाबूराव शहारे (वय २०, रा. विश्रांतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भोसरी परिसरात लॉटरी चालविणाऱ्या साई लॉटरी सेंटरचे पंडित विश्वनाथ चांमगले (वय ३५, रा. आदर्शनगर दिघी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच पिंपळेनिलख येथील दारूविक्री करणाऱ्या नारायण तुकाराम महाडीक (वय ५९, रा. सुतारआळी पिंपळे निलख) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विश्रांतवाडी खडकी रस्त्याच्या बाजूला मटका चालविणाऱ्यावर गुड्या ऊर्फ सूरज माचेरकर, मनोज सुरेश साळुंखे यांच्यावर मटका चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून सुमारे अडीच हजारांची रक्कम जप्त केली.
उद्योगनगरीत पोलिसांचे छापासत्र
By admin | Published: July 13, 2017 1:34 AM