शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

पोलिसांनो नागरिकांशी गैरवर्तणूक सोडा!

By admin | Published: November 16, 2015 3:01 AM

सर्वसामान्य नागरिकांशी गैरवर्तणूक, बेशिस्तपणा करणाऱ्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे

मुंबई: सर्वसामान्य नागरिकांशी गैरवर्तणूक, बेशिस्तपणा करणाऱ्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या, त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांशी वर्तणूक करताना पोलिसांनी कर्तव्याची जाणीव ठेवण्याची ताकीद पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी दिली आहे. काही लोकांच्या गैरकृत्यामुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होत असून, अशा घटनांना आळा न घातल्यास बेशिस्त वागणाऱ्या पोलिसांबरोबरच संबंधित वरिष्ठ निरीक्षक व प्रभारी अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. गणेशोत्सवाच्या वेळी लालबाग येथे तरुणीला व महिला पत्रकाराला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती, त्यानंतर सर्वत्र टीकेची झोड उठली. आठवडाभरापूर्वी अंबोली पोलीस ठाण्यात तरुण-तरुणीला पोलिसांकडून मारहाणीची घटना समोर आली. या दोन्ही घटनांचे काहींनी मोबाइलवर चित्रण करून ते व्हिडीओ सर्वत्र व्हायरल केले. त्यामुळे मुंबई पोलिसांची बदनामी झाली. त्यामुळे अशा प्रकाराला प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी परिपत्रक जारी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मुंबईत पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी नागरिकांशी आक्षेपार्ह वागणूक झाली आहे. त्याचबरोबर पदाचा गैरवापर करण्याच्या प्रकारात काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. काही नागरिकही पोलिसांकडून गैरकृत्य व्हावे, यासाठी चिथावण्यासारखे वर्तन करतात. पोलिसांनी त्याला बळी न पडता, नागरिकांशी जबाबदारीने व कायद्याच्या चौकटीत राहून वागले पाहिजे. गैरवर्तणूक करणाऱ्या पोलिसांचे व्हिडीओ शूटिंग करून त्याची क्लिप सर्वत्र पाठविल्या जातात. त्याचप्रमाणे, प्रसारमाध्यमांकडे पोहोचविल्या जातात. त्यामुळे काही पोलिसांच्या कृत्यामुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी होते. म्हणून प्रत्येक पोलीस ठाणे/शाखेच्या वरिष्ठ निरीक्षक, प्रभारी अधिकाऱ्यांनी त्याबाबत काळजी घ्यावी, असे जावेद अहमद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)