पिंपरी : हवामानातील बदलामुळे साथीच्या आजारांचा विळखा उद्योगनगरीला बसला असून, शहर तापाने फणफणले आहे. डेंगी, मलेरिया आणि चिकुनगुनिया या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत डेंगीचे ११९ रुग्ण आढळून आले आहेत, तर मलेरियाचे ४३ आणि चिकुनगुनियाचे १६ रुग्ण आढळून आले आहेत. साथीच्या आजारांनी रुग्णालये फुल झाली आहेत. गेल्या नऊ महिन्यांत स्वाइन फ्लूचे केवळ सहा रुग्ण आढळून आले आहेत. >साथीचे आजार वाढीकडे दुर्लक्षपिंपरी-चिंचवड महापालिकेला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. या वर्र्षी धरण १०० टक्के भरल्याने दिवसातून एकवेळ पाणीपुरवठा केला आहे. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढत असतात. डासोपत्तीच्या ठिकाणांकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे डेंगी, मलेरिया, चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पाण्यामुळे होणाऱ्या आजारात वाढ झाल्याची महापालिकेची आकडेवारी वाढत आहे, असा महापालिकेचा आलेख सांगतो. धुराळणी नावालाचआरोग्य विभागाचे कर्मचारी सुस्त असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीत केलेल्या आहेत. डासोत्त्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर असते. मात्र, तक्रार आल्यानंतरच कर्मचारी धुराळणीसाठी जातात. अन्य वेळी हे कर्मचारी धुराळणी करीत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.भोसरी, दिघीत डेंगी वाढलाभोसरी गावठाण, दिघी, कुदळवाडी, चिखली, चिंचवड वाल्हेकरवाडी, आकुर्डी परिसरात डेंगीसदृश आजारांचे रुग्ण वाढले आहेत. परिसरातील पाण्याची डबकी बुजवून डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र, कर्मचारी कमी असल्याचे कारण महापालिकेकडून दिले जात आहे, अशी तक्रार नागरिकांनी लोकमतकडे केली.पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र हे गेल्या ४४ वर्षांमध्ये ८६ चौरस किलोमीटरवरून १७७ चौरस किलोमीटर इतके वाढले आहे. गेल्या ३० वर्षांत नागरीकरण वेगाने वाढले आहे. वाढत्या नागरिकीकरणामुळे शहराच्या मूलभूत सुविधांवरही ताण येत आहे. वायू, पाणी, ध्वनिप्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. पिण्याचे पाणी आणि पावसाळ्यातील साचणारे पाणी यामुळे साथीचे आजार वाढत आहेत. याबाबत महापालिकेच्या पर्यावरण अहवालात गंभीर मुद्देही उपस्थित केले आहेत. महापालिका प्रशासन केवळ उपाययोजना करण्यापलीकडे काहीही ठोसपणे पावले उचलत नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उपाययोजनांवरील अंमलबजावणीकडे महापालिकेतील आरोग्य आणि पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यात थंडी, ताप, खोकला असे साथीचे आजार वाढतात. आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना कमी पडत असल्याचे आजार बळावत आहेत. गेल्या चार महिन्यांत डेंगीचे ११९ रुग्ण आढळून आले, तर मलेरियाचे ४३ आणि चिकुनगुनियाचे १६ रुग्ण आढळून आले आहेत. साथीच्या आजारांनी रुग्णालये फुल आहेत. गेल्या वर्षी तापाचे एक लाख ३७३९ रुग्ण आढळून आले होते.>आजार व त्याची लक्षणेताप : लक्षणे - कणकण, सुस्ती येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, उदासीनता येणेलेप्टोस्पायरोसिस : लक्षणे - थंडी वाजणे, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, पोटदुखी, डोळे लाल होणे, काहीवेळा त्वचेवर रॅश येणेस्वाइन फ्लू : लक्षणे - सर्दी, घशात खवखव, ताप, अंगदुखी गॅस्ट्रो : लक्षणे - पोटाच्या वरच्या भागात दुखणे, अन्नावरची इच्छा उडणे, उलट्या, ढेकरा येणे, भूक मंदावणेकावीळ : लक्षणे - अस्वस्थता वाटणे, सांधे दुखी, ताप, उलट्या किंवा अन्नावरची इच्छा उडणे, डोकेदुखीटायफॉइड : लक्षणे - भूक कमी लागणे, डोकेदुखी, अंगदुखी, ताप (४ डिग्रीपर्यंत जाऊ शकतो), सुस्तपणा येणे, उलट्या होणे, अन्नावरची इच्छा उडणेकॉलरा : लक्षणे - जुलाब, डायरिया, अशक्तपणा येणे, डिहायड्रेशन, पोटदुखीहे जरूर करापाणी उकळून, गाळून प्या, ताजे शिजलेले अन्न खा, खाण्याआधी हात स्वच्छ धुवा, साचलेल्या पाण्यातून चालू नका, पायाची जखम उघडी ठेवू नका, बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ धुवा, घराच्या परिसरात साचलेले पाणी काढून टाका>हे टाळा न शिजवलेले पदार्थ खाऊ नका, चटणी खाणे टाळा, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, स्टॉल्स, खाण्याच्या गाड्यांवरचे पाणी पिऊ नका, ताप २ ते ३ दिवसांपर्यंत अंगावर काढू नका, स्वत:च औषधे घेणे टाळा, पावसात अधिक काळ भिजू नका
शहर फणफणले साथीच्या तापाने
By admin | Published: September 24, 2016 1:21 AM