शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

कचऱ्याने केला शहरांचा घात

By admin | Published: May 05, 2017 6:06 AM

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या स्मार्ट शहरांचा क्रमांक गडगडला. बदलापूरही चांगले

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या स्मार्ट शहरांचा क्रमांक गडगडला. बदलापूरही चांगले स्थान राखू शकले नाही; पण त्याचे खापर सर्वांनी कचऱ्यावर फोडले आहे. त्या तुलनेत अंबरनाथ, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगरने चांगली प्रगती केली आहे. कचरा गोळा करणे, त्याचे वर्गीकरण, तो वाहून नेणे, त्याची विल्हेवाट, त्याबाबत नागरिकांत जागृती, पुरेशी स्वच्छतागृहे असणे आणि स्वच्छ सार्वजनिक शौचालये असे निकष यासाठी होते. पण शहरे सुधारणे सोडा, ती अधिकाधिक बकाल झाल्याचे वर्षभरात दिसून आले. स्वच्छतेचा फज्जाठाणे : ठाणे स्वच्छ ठेवण्यासाठी आयुक्तांनी घेतलेल्या जाहीर फज्जा उडाल्याचे यादीतून दिसत आहे. कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात, झोपड्यांत ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यातील अपयशामुळे क्रमांक घसरल्याचा पालिकेचा दावा आहे. वर्षभरात पालिकेने प्रभाग-शहराच्या स्तरावर स्वच्छता अभियान राबविले. हागणदारीमुक्ती, शौचालय उभारणी, साफसफाई मोहीम, कचऱ्याची विल्हेवाट यासाठी विविध प्रयोग हाती घेतले. कोट्यवधी खर्च केले. तरीही पालिकेचा क्रमांक १७ वरुन ११६ इतका खाली गेला. या संदर्भात पालिकेच्या संबंधित विभागाने मात्र गेल्यावर्षी ७५ शहरे होती, ती यंदा ५०० झाल्याने क्रमांक घसरल्याचा दावा केला. सध्या ठाण्यात कचरा वर्गीकरणासाठी जागृती सुरू आहे.परंतु नागरिकांनी सवयी बदलणे गरजेचे आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे. घनकचऱ्याचे आव्हानकल्याण : कल्याण-डोंबिवलीचा क्रमांक घसरल्याने घनकचरा प्रकल्प सुरु करणे हेच महापालिकेसमोरील मोठे आव्हान असल्याची माहिती या विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली. कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणार प्रकल्प सुरु झालेला नाही. आधारवाडी डंपिंग बंद झालेले नाही. भरावभूमी क्षेत्र विकसित झालेले नाही. बायोगॅस, कचऱ्यापासून खताचे प्रकल्प रेंगाळले आहेत. पण कोठेही कचरा टाकण्याची सवय नागरिकांनी बदलायला हवी आणि कचऱ्याचे वर्गीकरण सुरू करायला हवे, यावर त्यांनी भर दिला. कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू नसल्याने वेगळा गोळा केलेला कचराही पुन्हा एकाच ठिकाणी नेऊन टाकला जात असल्याने नागरिकही तो वेगळा करण्याकडे दुर्लक्ष करतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे त्याकडे पालिकेला लक्ष द्यावे लागेल.घंटागाडी यंत्रणा यशस्वी अंबरनाथ : अंबरनाथमधील कचरा उचलण्यासाठी नव्या घंटागाड्या, नवी यंत्रणा उभारली. त्याचा फायदा झाला आणि स्वच्छतेच्या निकषात अंबरनाथ शहराने जिल्ह्यातील अन्य पालिकांच्या तुलनेत वरचा क्रमांक पटकावल्याचे मुख्याधिकारी गणेश देशमुख म्हणाले. भाजी मार्केट, मच्छीमार्केटमधील व्यापाऱ्यांनाही कचरा गोळा करुन ठेवण्याची शिस्त लावल्याचा फायदा झाला. लग्नाचे हॉल आणि मैदाने येथे निर्माण होणारा कचरा लागलीच उचलण्यासाठी पालिकेने स्वतंत्र गाडीची व्यवस्था केली. झोपड्यांचे प्रमाण जास्त असले, तरी लहान गाड्यांची सोय केल्याने तेथील कचराही लगेच उचलला जातो. पण कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा सध्या शहरात नाही. ती वर्षभरात उभारली जाणार आहे.शौचालयांच्या दुरुस्तीचे काम केल्याने आणि नवी शौचालये उभारल्याने हागणदारीमुक्त करण्यात पालिकेला यश आले आहे. अपुऱ्या यंत्रणेचा फटका बदलापूर : बदलापूर शहरात कचरा उचलण्याची यंत्रणा अपुरी आहे. प्रभागनिहाय कचरा न उचलता शहराचे झोन करुन कचरा उचलण्याचे काम केले जात आहे. या यंत्रणेत सुधारणा केल्यास शहरातील कचरा उचलण्याचे काम चांगल्या पध्दतीने करता येईल. बदलापूरचा क्रमांक इतर पालिकांपेक्षा वरचा असला तरी प्रभागातील कचऱ्याचे काम बहुसंख्य नगरसेवकांकडे, त्यांच्या कार्यकर्त्यांकडे आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत आनंद आहे. जुन्या गाड्यांचा वापर करुन आणि जास्त कामगार दाखवत कमी कामगारांच्या मदतीने कचरा उचलण्याचे काम केले जाते. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची यंत्रणा असूनही सर्व कचरा एकत्र उचलून तो डम्पिंगवर टाकला जातो. कचऱ्यावर प्रक्रियाच होत नाही. लााखोंचा खर्च होऊन शौचालयांची अवस्था बिकट आहे. कचरामुक्तीला यश उल्हासनगर : उल्हासनगरच्या डम्पिंगची जागा बदललल्याने, कचरा उचलण्याचा ठेका दिल्याने, घंटागाड्या सुरू झाल्या, कचऱ्याचे वर्गीकरण सुरू झाले. त्यामुळे उल्हासनगरची ओळख बदलली आणि या शहराने कचऱ्याच्या विषयात कल्याण-हागणदारी मुक्तीसाठी २५०० पेक्षा जास्त वैयक्तिक शौचालये बांधली. सार्वजनिक शौचालयाची पुनर्बांधणी, दुरस्ती केली. त्यातील वीज व पाणीपुरवठा नियमित केला. कचरा उचलण्याचा ठेका दिल्याने कामगार घरोघरी जाऊन, तसेच घंटागाडीद्बारे दुकानातून कचरा उचलतात. ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण सुरू झाले आहे. एकाही रस्त्यावर एकत्र कचरा दिसला, तर ठेकेदारावर कारवाईचा इशारा दिल्याचा चांगला परिणाम झाला आणि शहरातील कचऱ्याची, स्वच्छतेची परिस्थिती सुधारली.जनजागृती फळलीभार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिकेने केलेली जनजागृती व कचरा विल्हेवाटी सुरु केलेल्या प्रक्रियेमुळे शहर स्वच्छ होत असल्याचे घनकचरा प्रकल्पाचे प्रमुख व उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी सांगितले. पालिकेने ओला-सुका करचा वेगळा करण्यास सुरूवात केली. धावगी-डोंगरला पुनर्प्रक्रिया प्रकल्प सुरु केला. ओल्या कचऱ्यापासून खत आणि सुका कचरा पदार्थनिहाय वेगवेगळा करुन तो पुनर्प्रक्रियेसाठी खाजगी व्यक्तींना वा कंपन्यांना विकला जाणार आहे. वर्गीकरण न करता कचरा टाकणाऱ्यांचा कचरा उचलला जाणार नाही. प्रसंगी त्यांचा पाणीपुरवठा खंडीत केला जाईल, असे उपायुक्तांकडुन सांगण्यात आले. सफाईनंतर प्रामुख्याने मासळी बाजाराच्या ठिकाणी दुर्गंधीरहित जंतुनाशक पावडरची फवारणी केली जाते. हे करुनही काही लोकांकडुन उघड्यावर कचरा टाकला जातो.