शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

पोलीस आयुक्तांच्या दणक्याने शहर डिजीटल मुक्त

By admin | Published: August 25, 2016 9:28 PM

पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या तंबीनंतर एकाच दिवसात शहर डिजीटल मुक्त झाले आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या कार्यालयात मंगळवारी सायंकाळी शहरातील अनाधिकृत

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 25   : पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या तंबीनंतर एकाच दिवसात शहर डिजीटल मुक्त झाले आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या कार्यालयात मंगळवारी सायंकाळी शहरातील अनाधिकृत धार्मिक स्थळांबाबत बैठक झाली. बैठकीला महापालिका आयुक्त विजयकुमार काळम, विभागीय अधिकारी, वरीष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. आयुक्त सेनगावकर यांनी धार्मिक स्थळांचा विषय दहा मिनिटात संपविला. शहरात नोंदणी नसलेली ११३0 धार्मिक स्थळे आहेत. यातील ५२५ धार्मिक स्थळे नियमित करण्यात आली आहेत. नव्याने कागदपत्रांची पडताळणी करून १२२ स्थळांना नियमित करण्यास मान्यता देण्यात आली.

आता ६४७ धार्मिक स्थळे शिल्लक असून, त्यातील १0६ काढून टाकता येण्यासारखी आहेत. उर्वरित ३२१ स्थळांची चाचपणी करून निर्णय घेतला जाणार आहे. अनाधिकृत धार्मिक स्थळे काठून टाकण्यास मार्च २0१७ पर्यंत मुदत आहे. त्यामुळे ही मोहीम सण,उत्सव झाल्यानंतर म्हणजे आॅक्टोबर—नोव्हेंबरमध्ये घेतली जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यानंतर आयुक्त सेनगावकर यांना अनाधिकृत डिजीटलकडे लक्ष वेधले. स्मार्ट सिटी म्हणून सोलापूरची निवड झालेली असताना असे विद्रुपीकरण शोभत नाही. महापालिकेचे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे हे पीक फोफावले आहे. याबाबत झोन अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले पाहिजे असा शब्दात त्यांनी सुनावले.

यात कोणाचीही गय करू नका अशा सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. पोलीस आयुक्तांच्या रूद्रावताराची मनपा अधिकाऱ्यांनी धास्ती घेतली. गुरूवारी दिवसभरात शहरातील डिजीटल गायब झाले. बुधवारपेठ, शिवाजी चौक, रंगभवन, कोंतम चौक येथून कार्यकर्त्यांनी स्वत:हून डिजीटल काढून घेतले तर जुळे सोलापूर, विजापूरनाका, कुमठानाका परिसरात मनपा अधिकाऱ्यांनी सूचना देऊन डिजीटल हटविले. अधिकाऱ्यानी सगळीकडे फेरफटका मारून याबाबत खातरजमा करून घेतली हे विशेष.