‘पदवीधर’साठी क्लास संचालकांनी कसली कंबर; अजित पवारांचे दुकान बंद करण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 08:45 AM2023-10-19T08:45:52+5:302023-10-19T08:46:18+5:30

कोचिंग क्लासचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची भाषा करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना संघटनेने इशारा दिला. 

class director in Action for 'Graduate election'; warning to Ajit Pawar close shop | ‘पदवीधर’साठी क्लास संचालकांनी कसली कंबर; अजित पवारांचे दुकान बंद करण्याचा इशारा

‘पदवीधर’साठी क्लास संचालकांनी कसली कंबर; अजित पवारांचे दुकान बंद करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोचिंग क्लास संचालक संघटनेच्या बुधवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आगामी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.  कोचिंग क्लासचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची भाषा करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना संघटनेने इशारा दिला. 

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सचिन सरोदे, खजिनदार सुनील सोनार, सहकार्यवाह रवींद्र प्रजापती, सदस्य शैलेश सकपाळ, अनिल काकुळते, विनायक चव्हाण, संतोष गोसावी आदी उपस्थित होते. कोचिंग क्लासच्या विकासासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करून दखल घेतली 
गेली नाही. 

४० हजार नोंदणी करण्याचा मानस
आम्हाला शासनाकडे मिळत नसलेली दाद आणि वेळोवेळी होणारा आमचा अपमान याचा समाचार घेणार असल्याचेही संघटनेने सांगितले. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत, पुढच्या वर्षी होणाऱ्या कोकण पदवीधर निवडणुकीमध्ये संघटनेचा उमेदवार देऊन तो निवडून आणण्याचा ठराव संमत करण्यात आला. यासाठी पाच हजार पदवीधर मतदारांची नोंदणी पूर्ण केली असून येत्या काळात ४० हजार नोंदणी करण्याचा मानस संघटनेने व्यक्त केला. 

उपमुख्यमंत्री पवार यांनी क्लासचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची भाषा केली. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. दुकान कोणाचे बंद होणार हा येणारा काळच ठरवेल आणि याची प्रचिती उपमुख्यमंत्री पवार यांना येईलच असा इशाराही त्यांनी दिला. 

Web Title: class director in Action for 'Graduate election'; warning to Ajit Pawar close shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.