शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

दहावी सीबीएसई बोर्डाच्या निकालाचा टक्का घसरला

By admin | Published: June 03, 2017 9:52 AM

आज दहावीच्या सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंड्री एज्युकेशन म्हणजेच सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 3-  आज दहावीच्या सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंड्री एज्युकेशन म्हणजेच सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर व्हायला सुरूवात झाली आहे. सीबीएसई बोर्डाचा पाच विभागांचा निकाल जाहीर झाला आहे. दिल्ली, चेन्नई, अलाहाबाद, देहरादून, त्रिवेंद्रम या पाच राज्यांचा निकाल जाहीर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावी सीबीएसई बोर्डाच्या निकाला टक्का घसरला आहे. यंदा 90. 95 टक्के निकाल लागला आहे तर गेल्यावर्षी 96.21 टक्के निकाल लागला होता. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
 
12 वीच्या निकालानंतर दहावीची मुलं निकालाची वाट पाहत होती. मुलांची प्रतिक्षा आज संपणार आहे. यावर्षी ही परीक्षा ९ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेला देशभरातून १६.५ लाख विद्यार्थी बसले होते.
सीबीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ३ जून रोजी दुपारपर्यंत शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होतील. cbseresults.nic.in या संकेतस्थळावर हे निकाल पाहता येतील.
 
सीबीएसईने १२ वीचा निकाल २८ मे रोजी जाहीर केल्यानंतर आता १० वीच्या निकालाची तारीख घोषित केली आहे. ऑनलाईन निकाल पाहत असताना विद्यार्थ्यांनी आपलं नाव, जन्मतारीख, परीक्षा क्रमांक आणि इतर माहिती तपासून घेणं गरजेचं आहे. ऑनलाईन निकालानंतर काही दिवसांतच विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत गुणपत्रिका उपलब्ध होतील.
दहावी परिक्षेच्या निकालाबाबतीत झालेल्या सुधारणा धोरणाच्या वादामुळे यंदा बारावी सीबीएसईचा निकालही लांबणीवर गेला होता. कॉलेजच्या हाय कट ऑफ लिस्टमुळे मॉडरेशन पॉलिसी बंद केली होती. या पॉलिसीनुसार कठीण प्रश्नांवर विद्यार्थ्यांना जादा गुण दिले जातात.
 
पालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने मॉडरेशन पॉलिसी कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. यावर्षीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या मार्कांचं मुल्यमापन ग्रेस मार्क्स पॉलिसीच्या आधारावर होइल, असं कोर्टाने आदेशात सांगितलं होतं. मॉडरेशन पॉलिसीमध्ये कठीण प्रश्नावर विद्यार्थ्यांना 15 टक्के मार्क देण्याचा नियम आहे. यावर्षी या निर्णयाचा बारावीच्या ११ लाख विद्यार्थ्यांना आणि १० वीच्या ९ लाख विद्यार्थ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे.