मुंबई : आयटीआयमध्ये दोन वर्षांचा टे्रड पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीचा दर्जा देण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. परिणामी विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेतून मुक्ती मिळणार असून, पदवीच्या कोणत्याही शाखांना थेट प्रवेश घेता येणार आहे.संबंधित विद्यार्थ्यांना केवळ नॅशनल स्कूलकडून दोन विषयांची आॅनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर बारावीच्या निकालाऐवजी संबंधित विद्यार्थ्यांना बारावी समकक्ष समजले जाईल. त्यामुळे यापुढे विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र नॅशनल ओपन स्कूलच्या (राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था) माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे. १० व ११ डिसेंबरला दोन विषयांची परीक्षा होईल. संबंधित विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. ँ३३स्र://६६६.ल्ल्रङ्म२.ंू.्रल्ल वर नोंदणी करावी. (प्रतिनिधी)>आॅनलाइन अर्जआयटीआयकडून मिळालेले राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र आणि अन्य माहिती आॅनलाइन अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. बारावीच्या प्रमाणपत्रासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला २ हजार ४६० रुपयांचा डीडी ‘सेक्रेटरी, एनआयओएस’ या नावे काढून द्यावा लागणार आहे. सर्व कागदपत्रे आॅनलाइन सादर करावी लागतील. परीक्षा शुल्काचा भरणा डिमांड ड्राफ्टने पोस्टाद्वारे पाठवावा लागेल, अशी माहिती व्यवसाय शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक योगेश पाटील यांनी दिली.
आयटीआय उत्तीर्णांना बारावीचा दर्जा
By admin | Published: September 24, 2016 4:06 AM