शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

शास्त्रीय संगीत तुटल्याची खंत - लता मंगेशकर

By admin | Published: May 13, 2017 2:30 AM

शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतल्यानंतर, चित्रपटातील गाणी गायल्याने शास्त्रीय संगीत तुटल्याची खंत प्रख्यात पार्श्वगायिका

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतल्यानंतर, चित्रपटातील गाणी गायल्याने शास्त्रीय संगीत तुटल्याची खंत प्रख्यात पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली. गुरुकुल पद्धतीने शिष्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पुण्याच्या विश्वशांती संगीत कला अकादमीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते ‘प्रभुकुंज’ या त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी झाले. त्या वेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. लतादीदी गुरुकुल अकादमीच्या अध्यक्षा आहेत. त्या म्हणाल्या, ‘या अकादमीच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताची सेवा करण्याची संधी पुन्हा मिळणार आहे. या ठिकाणी प्रत्येक गुरूने त्याला जे काही येते, ते शिष्याला शिकवण्याचा प्रयत्न करावा, तर शिष्यांनीही लहान होऊन जे-जे शिकता येईल, ते शिकून घ्यावे. देशातील पहिला-वहिला प्रयोग असलेल्या या गुरुकुलमार्फत शास्त्रीय संगीताचा वारसा टिकवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी त्यांनी दाखवली. स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर आणि देशातील जेवढे संत आहेत, त्यांची मी भक्त असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपण भारतीय राहावे, हेच भारतीय संस्कृती शिकवते. मात्र, संगीताच्या नावावर हल्ली जे काही चालले आहे, ते चुकीचे असल्याची टीकाही त्यांनी केली. पृथ्वी गोल असून, लोकांसमोर जे येते, त्याचा ते स्वीकार करत असतात,’ असे त्यांनी सांगितले.येथे गुरू कमाल १५ शिष्यांना प्रशिक्षण देतील. प्रशिक्षणार्थ्यांच्या संख्येहून अधिक भर हा त्यांच्यातील सुप्त गुणांना दिला जाईल. त्यानुसारच त्यांची निवडही केली जाईल, असे अकादमीचे संचालक सुरेंद्र मोहिते यांनी सांगितले. तर गुरूकुल पद्धतीने शास्त्रीय संगीताचे धडे देण्यासाठी भव्य वास्तू तयार होईल, असे स्वप्नातही वाटले नसल्याचे ज्येष्ठ बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया म्हणाले. या वेळी एमएईईआर एमआयटी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशनचे उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, अकादमीच्या संचालिका ज्योती ढाकणे, सरचिटणीस आदिनाथ मंगेशकर यांची प्रमुख उपस्थिती होती.दिग्गजांकडून प्रशिक्षणया अकादमीमध्ये शास्त्रीय संगीतामधील दिग्गज कलाकार मोफत प्रशिक्षण देतील. त्यात व्हायोलिनवादक विदुषी डॉ. एन. राजम, बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, सुगम संगीतामधील ज्येष्ठ गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर, तालयोगी पंडित सुरेश तळवळकर, पंडित उल्हास कशालकर, ज्येष्ठ नृत्यांगना शमाताई भाटे, ज्येष्ठ गायिका देवकी पंडित आदींचा समावेश आहे.... तोपर्यंत प्रशिक्षण सुरूच राहीलएकविसावे शतक भारतीय संस्कृतीमधील सुवर्णकाळ असेल, असे वक्तव्य स्वामी विवेकानंद यांनी केल्याची आठवण अकादमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी करून दिली. ते म्हणाले, विवेकानंदांचे वाक्य काही अर्थाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. आजचा दिवस नक्कीच भारतीय संस्कृतीमध्ये सुवर्ण अक्षराने नोंदवला जाईल. या अकादमीमार्फत मोफत प्रशिक्षण देण्याची घोषणा केली. संस्थेचे गुरू विद्यार्थ्यांची निवड करतील. प्रशिक्षण पूर्ण करण्याचा कोणताही कालावधी नसून, जोपर्यंत गुरूला वाटत नाही, तोपर्यंत प्रशिक्षण सुरू राहील, असे डॉ. कराड म्हणाले