शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शिखर बँक घोटाळा प्रकरणी सुनेत्रा पवारांना क्लीन चिट; रोहित पवारांनाही दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 7:53 AM

शिखर बँकेकडून कर्ज घेतल्यानंतरही या साखर कारखान्याची आर्थिक स्थिती खालावली. राजेंद्र घाडगे यांच्या जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. आणि सुनेत्रा पवार संचालक असलेल्या जय ॲग्रोटेक या दोन कंपन्यांनी आर्थिक मदत केली

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषणने (ईओडब्ल्यू) विशेष न्यायालयात सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व पुतणे रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या व्यवहारांमध्ये गुन्हा झाला नसल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे. 

जानेवारीमध्ये  ईओडब्ल्यूने शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. सुनेत्रा पवार, रोहित पवार आणि प्राजक्त तानपुरे यांच्या तीन व्यवहारांचा हवाला देत ईओडब्ल्यूने  साखर कारखान्यांना कर्ज देण्यात तसेच खरेदीत कोणताही गुन्हा झाला नसल्याचे अहवालात म्हटले आहे. सातारा येथे असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याच्या विक्रीशी संबंधित हा व्यवहार आहे.  हा कारखाना गुरू कमॉडिटी सर्व्हिस लि.ला २०१० मध्ये ६५ कोटी रुपयांना विकण्यात आला. शिखर बँकेकडून कर्ज घेतल्यानंतरही या साखर कारखान्याची आर्थिक स्थिती खालावली. राजेंद्र घाडगे यांच्या जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. आणि सुनेत्रा पवार संचालक असलेल्या जय ॲग्रोटेक या दोन कंपन्यांनी आर्थिक मदत केली. 

रोहित व राजेंद्र पवार यांनाही दिलासाजय ॲग्रोटेकने जेव्हा गुरू कमॉडिटीला आर्थिक मदत केली त्यावेळी सुनेत्रा पवार यांनी संचालक पदावरून राजीनामा दिला होता, असे ईओडब्ल्यूच्या अहवालात म्हटले आहे. अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे आणि पत्नी सुनेत्रा पवार साखर कारखान्याच्या विक्रीच्या दोन वर्षे आधी संचालक मंडळावर होत्या. कारखान्याची विक्री उच्च न्यायालयाच्या २०१० च्या आदेशानुसार करण्यात आली, असेही अहवालात नमूद आहे. ईओडब्ल्यूने अहवालात रोहित व राजेंद्र पवार यांनाही क्लीन चिट दिली. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने २०२३ मध्ये दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात प्राजक्त तनपुरे यांच्यासह रणजित देशमुख, अर्जुन खोतकर यांनाही आरोपी केले आहे. राम गणेश गडकरी साखर  कारखान्याच्या विक्री व्यवहाराशी संबंधित हा आरोप आहे. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४baramati-pcबारामती