मुंबई : मुंबईकरांना शिस्त लावण्यासाठी क्लीन अप मार्शल योजना पुनरुज्जीवित करण्यात येणार आहे़ चार वर्षांनंतर ही मोहीम पुन्हा एकदा मुंबईत राबविण्यात येत आहे़ मात्र या वेळी मार्शल्सचे अधिकार कमी करण्यात आले आहेत़ सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, लघुशंका करणाऱ्या, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी २००७ मध्ये क्लीन अप मार्शल्सची नियुक्ती करण्यात आली होती. खासगी सुरक्षा कंपनीला दंड करण्याचे अधिकार या मार्शल्सला देण्यात आल्याने त्यांची मुजोरी वाढली़ अनेक ठिकाणी मार्शल्सनी दमदाटीने वसुली सुरू केल्याच्या तक्रारी येऊ लागल्या़तीन वेळा गुंडाळलेली ही योजना २०१२ मध्ये कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला़ परंतु मार्शल्सशिवाय मुंबईचे परिसर स्वच्छ ठेवणे शक्य नाही, असा साक्षात्कार पालिकेला झाला आहे़ त्यामुळे नव्याने मार्शल्सची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आज मंजूर करण्यात आला़ (प्रतिनिधी)प्रत्येक वॉर्डात तैनातडेब्रिज आणि जैविक कचरा टाकणाऱ्यांकडून अनुक्रमे २० हजार आणि १० हजार दंड वसूल करण्यात येत होता़ यामध्ये मार्शल्स सर्वाधिक तोडपाणी करत असल्याने हा दंड या योजनेतून रद्द करण्यात आला आहे़ प्रत्येक वॉर्डात किमान ११ ते १२ मार्शल्स तैनात ठेवण्यात येतील़ सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणाऱ्यांकडून १०० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे़
मुंबईत पुन्हा ‘क्लीन अप मार्शल्स’
By admin | Published: April 15, 2016 4:56 AM