ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ५ - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरच्या दिशेने निघालेल्या वारीत स्वच्छतेचा रोबोट (यंत्र मानव) अवतरला असुन वारीतील वारक-यांचे लक्ष त्याने वेधून घेतल आहे. वाशिम येथील शिक्षक गोपाल खाडे यांनी हा रोबोट साकारला असुन ते यामार्फत लोकांना स्वच्छतेचे संदेश देत आहेत.
राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता दिंडीत वाशिमसह 16 जिल्हा परिषदेचे कलापथक सहभागी झाले आहेत. स्वच्छ भारत मिशनच्या वतीने वाशिम येथील गोपाल खाडे यांनी स्वत: स्वच्छतेचा रोबोट साकारला असुन ते यावर्षी स्वच्छता दिंडीत सहभागी झालेआहेत. ते वाशिम जिल्ह्यातील कामरगाव (ता. कारंजा) येथे शिक्षक असुन शासनाच्या वेगवेगळ्या अभियांनात ते उत्स्फुर्तपणे सहभागी होत असतात.
वाशिम जिल्ह्यात त्यांनी स्वच्छतेच्या अनेक उपक्रमात भाग घेतला होता. त्यांच्या कामाची दखल घेऊन वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी गणेश पाटील आणि उप मुख्य कायर्कारी अधिकारी महेश पाटील यांनी त्यांना राज्याच्या स्वच्छता दिंडीत पाठविले आहे.