मुंबई : पंतप्रधानांनी सुरू केलेले स्वच्छ भारत अभियान देशभर सुरू आहे. दादर (पश्चिम) स्थानकावर मात्र या अभियानाचा मागमूसही नसल्याचेच समोर येत आहे. या प्लॅटफॉर्मवरील स्वच्छतागृहे अत्यंत गलिच्छ आणि अस्वच्छ बनल्याने प्रवाशांना याचा मनस्ताप सोसावा लागत आहे. दादरच्या फलाट क्रमांक २ आणि ३ वरील स्वच्छतागृह अत्यंत अस्वच्छ स्थितीत आहेत. स्थानकांवरील या स्वच्छतागृहाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. स्वच्छतागृहांत पुरेशा पाण्याची सोयदेखील नाही. मूत्र विसर्जनाची भांडी तुडुंब भरलेली असतात. तर मोकळ्या जागेत पाणी साचलेले असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. पाण्याचे नळ सतत गळत्या स्थितीत आहेत. ही जागा स्वच्छ करावी अशी प्रवाशांची मागणी आहे.(प्रतिनिधी)दादर स्थानकावरील फलाट क्रमांक १ वरील शौचालय कंत्राट पद्धतीने दिलेले आहे, त्यामुळे ते स्वच्छ ठेवले जाते. पण फलाट २ व ३ वरील स्वच्छतागृहे सार्वजनिक असल्यामुळे याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. - चंद्रप्रसाद दीक्षित, प्रवासीया स्वच्छतागृहांतील अस्वच्छतेचे आम्ही वारंवार फोटो काढून सोशल मीडियावर टाकतो. जेणेकरून ही स्थिती सर्व जनतेला कळेल. पण त्याचाही काही उपयोग होत नसल्याने सोशल मीडिया निरुपयोगी बनल्याचे वाटते. एवढे होऊनही संबंधित यंत्रणा मात्र ढिम्म बनली आहे. - रोहन पारकर, प्रवासी
स्वच्छता मोहीम कोलमडली
By admin | Published: April 28, 2017 2:34 AM