शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
4
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
5
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
6
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
7
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
8
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
9
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
10
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
11
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
12
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
14
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
15
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
16
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
17
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
18
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
19
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
20
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'

गंगामैयाची स्वच्छता हे माझे पहिले काम

By admin | Published: May 18, 2014 1:08 AM

गंगेची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले आहे, अशी भावनिक कृतज्ञता व्यक्त करतानाच गंगामैयाची स्वच्छता करणो हे माङो पहिले काम असणार आहे, अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे दिली.

मोदींनी वाराणशीत दिले अभिवचन वाराणशी : गंगेची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले आहे, अशी भावनिक कृतज्ञता व्यक्त करतानाच गंगामैयाची स्वच्छता करणे हे माझे पहिले काम असणार आहे, अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे दिली. विश्वनाथ मंदिरात आशीर्वाद घेऊन मोदी दशाश्वमेध घाटावर पोहोचले़ तेथे वेदमंत्रांचा घोष व शंखनाद अशा भक्तीमय वातावरणात सुमारे अर्धा तास मोदींनी ‘गंगा आरती’ केली़ भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह, अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी त्यांच्यासोबत होते़ गंगा आरतीनंतर मोदी म्हणाले, या पवित्र भूमीला आणि मतदारांना मी नमन करतो. येथे उमेदवार म्हणून आलो मात्र काशीचा पुत्र होऊन गेलो आहे. न मागताच जी सर्व काही देते तिला आई म्हणतात. गंगा मातेनेही माझ्यासाठी काही खास कामाची योजना ठरवून ठेवली असणार. मोदी म्हणाले, येथे आर्थिक विकासाच्या अनेक संधी आहेत. तुमच्या साथीने मला विकास साध्य करता येईल.

मला केवळ तुमचे मतच नव्हे, तर तुमची साथ व सोबत हवी आहे. सभेला परवानगी नाकारून मला वाराणशीत बोलूही दिले गेले नव्हते. तरीही माझ्या मौनावरही तुम्ही विजयाचे शिक्कामोर्तब केलेत, असे सांगत त्यांनी मतदारांचे आभार मानले. गांधीजींची १५० वी जयंती खर्‍या अर्थाने साजरी करण्यासाठी मी एका कामाची जबाबदारी वाराणशीच्या लोकांवर सोपावतो आहे. गांधींनी स्वच्छतेवर भर दिला होता. म्हणूनच काशीमध्ये साफसफाई झाली पाहिजे़ पंतप्रधानाने फक्त अमेरिका, रशिया या विषयावर बोललेच पाहिजे असे नाही, छोट्या-छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायला हवी, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)