शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘स्वच्छता’ पॅटर्न राज्यात राबविणार

By admin | Published: November 19, 2015 2:20 AM

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील सहा नगरपालिकांनी सर्वोत्कृष्ट कार्य केले असून, स्वच्छतेसाठी त्यांनी केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी आता राज्यातील जवळपास

- यदु जोशी,  मुंबईस्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील सहा नगरपालिकांनी सर्वोत्कृष्ट कार्य केले असून, स्वच्छतेसाठी त्यांनी केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी आता राज्यातील जवळपास तीनशे नगरपालिकांमध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. वेंगुर्ला (जि.सिंधुदुर्ग), लोणावळा, शिरुर (पुणे), सांगोला (सोलापूर), देवळाली प्रवरा (अहमदनगर) आणि उमरेड (नागपूर) या सहा नगरपालिकांना हा बहुमान मिळाला आहे. त्यांना लवकरच नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती या विभागाच्या प्रधान सचिव मीता राजीवलोचन यांनी ‘लोकमत’ला दिली. दारोदारी कचरा संकलनाचे प्रमाण, घरोघरी ओला व सुका कचऱ्याचे होत असलेले विलगीकरण, प्लॅस्टिक बंदी (५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या) आणि हागणदारीमुक्तीची स्थिती या चार निकषांचे पालन कितपत केले आहे, या बाबतची माहिती नगरपालिका प्रशासनाने मागविली होती. २४ नगरपालिकांनी तसा दावा केला. मात्र, निकषांनुसार ९ नगरपालिका प्रशासनाकडून पाहणीसाठी निवडण्यात आल्या. नाशिक विभागीय आयुक्तालयातील प्रादेशिक उपसंचालक विजय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या नऊही नगरपालिकांची पाहणी करून त्यातील ६ नगरपालिकांची निवड केली. समितीने काल आपला अहवाल सादर केला. या नगरपालिकांमधील स्वच्छता उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल. दर तीन महिन्यांनी ३० नगरपालिका ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानाखाली आणल्या जातील, अशी माहिती मीता राजीवलोचन यांनी दिली.मालमत्ता करासाठी होणार सॅटेलाइट सर्वेक्षणराज्याच्या नगरपालिकांमधील जवळपास ३० टक्के संपत्तीवर मालमत्ता करच लावला जात नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर, आता या संपत्तीचे सॅटेलाइट सर्वेक्षण करण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मीता राजीवलोचन यांनी सांगितले की, सॅटेलाइटने एकदा नगरपालिका क्षेत्रातील घरांबाबतचे नकाशे दिले की, एक एजन्सी प्रत्यक्ष पाहणी करून त्या घरांवरील मालमत्ता कर किती, ते नियमानुसार निश्चित करणार आहे. त्यामुळे मालमत्ता कराच्या आकारणीतून आतापर्यंत वाचलेल्यांना तो भरावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात १८० नगरपालिकांमध्ये असे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.स्वच्छतेचे अनोखे उपक्रमलोणावळामध्ये शालेय विद्यार्थी आपली शाळा, घर परिसरातील किती कचरा उचलून योग्य ठिकाणी टाकला, याचा हिशेब पासबुकात ठेवतात. शिरुर नगरपालिकेने हागणदारीमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार केले आहे. वेंगुर्ले नगरपालिकेत कचऱ्यापासून वीजनिर्मिती करून, त्यावर पथदिव्यांसाठी वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सुक्या कचऱ्यापासून कांडी कोळसा तयार करण्याचा प्रकल्प लवकरच सुरू होईल. शहरात गोळा झालेले प्लॅस्टिक प्रक्रिया करून रस्ते डांबरीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. सांगोलेमध्ये उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांना फुले देणे, त्यांचे फोटो काढणे, हे फोटो नगरपालिकेने तयार केलेल्या विशेष बॅनरमध्ये लावून प्रसिद्ध करणे, वरात काढणे असे विविध उपक्रम राबविले. शहरातील कचरा एका ठिकाणी गोळा करण्याऐवजी, त्यावर आहे त्याच ठिकाणी प्रक्रिया करण्याची पद्धत देवळाली प्रवरा नगरपालिकेने अवलंबिली आहे.