शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

'मोदी पंतप्रधान होणार नाहीत', क्लिक करा अन् पवारांच्या भाकितावर मत नोंदवा  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 8:03 PM

सर्वच पातळीवर अपयशी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सध्या देशापुढील राष्ट्रीय आपत्ती असल्याची टीका राष्ट्रीवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केली होती.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर देशात खळबळ उडाली. भाजपाला बहुमत मिळेल, पण नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असे म्हणत भाजपात अंतर्गत कलह निर्माण करण्याचा डाव पवार यांनी साधला आहे. मात्र, पवारांचे हे वक्तव्य आपणास योग्य वाटते का ? पवारांच्या या भाकिताबद्दल तुमचे मत काय ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न लोकमत डॉट कॉम करत आहे. त्यासाठी खालील लिंकवरील होय किंवा नाही हे बटन दाबून तुम्ही आपले मत नोंदवू शकता. 

आपण नोंदविलेल्या मतांची टक्केवारी पाहून जनतेच्या 'मन की बात' आम्ही तुम्हाला सांगू. त्यामुळे आपेल ऑनलाईन मत नोंदवत पवार यांच्या मताशी सहमती अथवा असहमती दर्शवा. 

भाजपा सर्वात मोठा पक्ष होईल, पण मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत- शरद पवार

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींच्या पुन्हा पंतप्रधान होण्याच्या इराद्यावर मोठं विधान केलं आहे. मला जर थोडंसं राजकारण कळत असेल, तर मी नक्कीच सांगू शकतो की, लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. मी काही ज्योतिषी नाही. पण मला असं वाटतं की त्यांना आवश्यक असलेलं संख्याबळ मिळणार नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असं मला वाटतं. त्यांचं संख्याबळ घटणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तो एकमेव सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येऊ शकतो. परंतु त्यांना सरकार स्थापण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. असे झाल्यास भाजपाला पंतप्रधानपदासाठी नवा उमेदवार शोधावा लागेल, असे भाकित पवार यांनी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर चारच दिवसात केले आहे. 

सर्वच पातळीवर अपयशी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सध्या देशापुढील राष्ट्रीय आपत्ती असल्याची टीका राष्ट्रीवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केली होती. कार्यकर्त्यांसमोर पवार म्हणाले होते की, ‘मोदी सध्या गांधी घराण्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करत आहेत, परंतु याच घराण्यातील दोन पंतप्रधानांनी देशसेवेसाठी बलिदान दिले, त्याचा त्यांना विसर पडला आहे. मोदी यांची संकुचित विचारसरणी दिसून येते. जर देशाच्या पंतप्रधानांचे विचार संकुचित असतील, तर कोणताही देश पुढे जाऊ शकत नाही.’चार राज्यांच्या निकालामुळे जनतेचा कल सत्ताधाऱ्यांना कळला असून, येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव होईल हे माहीत झाले आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव खेळला जाण्याची व निवडणुकीत गैरप्रकार केला जाण्याची भीतीही पवार यांनी व्यक्त केली. सैन्याने आपले शौर्य जगाला दाखवून दिले, परंतु याचे भाजपाने भांडवल करून झेंडे नाचवायला सुरुवात केली. कष्ट कोणी केले, शौर्य कोणी बजावले व छाती कोण बडवतो? असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक