शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

वातावरणातील बदलांमुळे ऊर्जेच्या निर्मितीत घट होणार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजीच्या अभ्यासातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 2:45 PM

‘ॲनालिसिस ऑफ फ्यूचर विंड ॲण्ड सोलर पोटेन्शियल ओव्हर इंडिया युजिंग क्लायमेट मॉडेल्स’ या शीर्षकाचा अभ्यास नुकताच करंट सायन्स या पिअर - रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

मुंबई : वातावरण बदलाचा परिणाम अनेक क्षेत्रांवर आणि आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत घटकांवर होत असतो. तसाच परिणाम राज्याच्या सौर आणि पवन ऊर्जेच्या संभाव्य क्षमता विकसनावरदेखील पुढील पाच दशके होणार असल्याचे पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजी (आयआयटीएम) या संस्थेच्या संशोधकांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. 

‘ॲनालिसिस ऑफ फ्यूचर विंड ॲण्ड सोलर पोटेन्शियल ओव्हर इंडिया युजिंग क्लायमेट मॉडेल्स’ या शीर्षकाचा अभ्यास नुकताच करंट सायन्स या पिअर - रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. भू-विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या आयआयटीएम, पुणे येथील टीएस आनंद, दीपा गोपालकृष्णन आणि पार्थसारथी मुखोपाध्याय तसेच, न्यूयॉर्क विद्यापीठ अबुधाबी येथील सेंटर फॉर प्रोटोटाईप क्लायमेट मॉडेलिंग येथील संशोधकांचा यामध्ये समावेश आहे.

वातावरण बदलामुळे सौरऊर्जेच्या निर्मितीत घट होण्याची शक्यता देशात दिसत आहे. तसेच देशाच्या काही भागातील महत्त्वाच्या पवन ऊर्जा प्रकल्पांवरदेखील परिणाम होणार आहे. सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी केंद्राकडून संशोधनासाठी अनेक क्षेत्रांमध्ये निधी दिला गेला आहे. ज्यामध्ये सोलर सेलची कार्यक्षमता वाढविणे, विंड टर्बाईन हबची उंची वाढविणे आणि मोठ्या रोटोर ब्लेडची निर्मिती या विषयांचा समावेश आहे.

     अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी स्थापित यंत्रणेच्या क्षमतेमध्ये (१०.७८ गिगावॅट) महाराष्ट्र देशातील अव्वल राज्यांमध्ये आहे. ज्यामध्ये पवन ऊर्जा ५.०१ गिगावॅट आणि सौर ऊर्जा २.७५ गिगावॅटचा वाटा आहे. २) महाराष्ट्रातील एकूण ऊर्जा निर्मितीमध्ये ३० जून २०२२पर्यंत २४.३६ टक्के वाटा अक्षय ऊर्जा क्षेत्राचा आहे.     सध्या देशभरातील पवन ऊर्जा निर्मितीमध्ये १५ टक्के वाटा राज्य उचलत आहे.     महाराष्ट्रात २०३०पर्यंत ४० टक्के ऊर्जा ही अक्षय ऊर्जा स्रोतांद्वारे निर्माण केली जाणार आहे.     महाराष्ट्रातील स्थापित सौर ऊर्जा क्षमता ही २०१६ आणि २०२१ च्या दरम्यान ६१४ टक्क्यांनी वाढली आहे.     २०१६मध्ये ३८५.७६ मेगावॅटवरुन २०२२मध्ये २७५३.३० मेगावॅट झाली आहे.

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सौर ऊर्जेच्या क्षमतेबाबत घट होईल. वर्षभरातील सर्व ऋतूंसाठी घट होण्याची शक्यता आहे. पश्चिम भारतातील सौर विकिरण हे सर्व ऋतूंमध्ये कमी होण्याची शक्यता असून, त्यामुळे सौर ऊर्जेची निर्मिती घटण्याची शक्यता आहे. पुढील पन्नास वर्षात १० ते १५ टक्के असेल. मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरच्या कालावधीतील ढगांचे आच्छादन वाढण्यानेदेखील हा परिणाम होऊ शकतो.- पार्थसारथी मुखोपाध्याय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिलक मेटरॉलॉजी, पुणे

टॅग्स :environmentपर्यावरण