पुणे : हवामानात होणाऱ्या बदलाचा अचूक अंदाज घेण्यासाठी ५० क्लायमेट रेफरन्स स्टेशन उभारण्यात येणार असून, त्यातील २ स्टेशन या वर्षी उभारणार असल्याचे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ़ एम़ राजीवन यांनी सांगितले़ पाषाण येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी येथे ‘हवामानातील बदल आणि त्याचा दक्षिण आशियावर होणारा परिणाम’ या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन राजीवन यांच्या हस्ते झाले़ याप्रसंगी ते बोलत होते़ या कार्यशाळेत भारताबरोबरच कॅनडा, इटली, अमेरिका, ब्राझिल, दक्षिण कोरिया, इथिओपिया, इराण, श्रीलंका, टांझानिया येथील हवामान शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत़ डॉ़ राजीवन म्हणाले, ‘‘या प्रकल्पांतर्गत मानवी हस्तक्षेप नसणाऱ्या५० क्लायमेट रेफरन्स स्टेशन उभारण्यात येणार आहे़ त्यातील २ स्टेशन हिमालय आणि अंटार्टिका येथे या वर्षी उभारण्यात येणार आहे़ हवामान विभागाची जगभरातील एक महत्त्वाचे संशोधन केंद्रात गणना होण्यासाठी मूलभूत संशोधन, समुद्रावरील वातावरण, हवामान अंदाजात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे़ हवामानाचा अभ्यास करताना समुद्र, जमिनीवरील हवामानाची माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे़ त्यादृष्टीने मध्य भारतात दोन अभ्यास केंद्रे स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले़ डॉ़ व्ही़ बालाजी यांनी सांगितले की, हवामान विभागातर्फे हे नवीन कम्युनिटी मॉडेल तयार केले आहे़ या मॉडेलमुळे मॉन्सूनचा अंदाज ३ महिने आधी देता येईल़ (प्रतिनिधी)वातावरणाच्या अभ्यासासाठी सेंटरची उभारणीआणि जमिनीवरील हवामानाच्या अभ्यासासाठी देशात आणखी निरीक्षण केंद्रांची आवश्यकता आहे़ ही ५० केंद्रे ५० किमी परिसरातील तापमान, आर्द्रता, हवेचा वेग तसेच हवामानाशी संबंधित अनेक घटकांचे निरीक्षण करेल़ यासाठी आधुनिक उपकरणाचा वापर करण्यात येणार आहे़, असे डॉ़ एम. राजीवन यांनी सांगितले़
क्लायमेट रेफरन्स स्टेशन उभारणार
By admin | Published: July 19, 2016 12:57 AM