पुणे : राहुल गांधी यांच्या पणजोबा, आजोबा, वडील, आजी सर्वांनी गरीबी हटाव ची घोषणा दिली होती. आणि आजदेखील काँग्रेस गरीबी हटावचीच घोषणा देत आहे. काँग्रेसने गरीबी दूर केली ती फक्त आपआपल्या पार्टीतल्या चेल्यांची...त्यामुळे टिव्ही मालिकांच्या आधी दाखवतात तशी राहुल गांधी यांच्या भाषणाआधी क्लिप येईल, या भाषणाचा वास्तवाशी काही संबध नाही, असी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केली. भारतीय जनता पार्टी व शिवसेना प्रणित महायुतीचे लोकसभा निवडणुक उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ वडगाव शेरी येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी बारतीय जनता पार्टीचे विविध नेते व पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, काँगेसने जाहीर नाम्यात सांगितले की, प्रत्येक गरीबांच्या खात्यात 72 हजार जमा करणार , मात्र, हे पैसे ते कुठुन आले हे राहुल यांना सांगता आले नाही. पण गेल्या पाच वर्षांत अनिल शिरोळे, मोदींनी जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली. तुम्हाला देश कुणाच्या हाती द्यायचा आहे याचा विचार करावा लागेल. आम्ही 5 वर्षात जे विकास कामे केली त्यावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत..2022 मध्ये देशातील प्रत्येकाला घर असेल एकहीजण बेघर नसेल.. सव्वा लाख घरे बांधण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. आयुष्मान योजना, 5 लाख रूपयांची योजना, दोन महिन्यात 20 लाख लोकांची ऑपरेशन या योजनेतंर्गत झाली . मोदींनी 34 कोटी लोकांची बँकेत खाती सुरू केली. तसेच लोकांना शौचालय नव्हते. 5 वर्षात 98 % लोकांकडे शौचालये आहेत. ऊज्वला गँस योजना केली. महिलांच्या शरीरात स्वयंपाक करताना धूर जातो म्हणून १३ कोटी लोकांना गँस दिला. जगदीश घसा बसला तरी हरकत नाही काँग्रेसला घरी बसवल्याशिवाय राहू नकोस. निवडणूक गल्लीतील नाही दिल्लीतील आहे. देश कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो याची निवडणूक आहे.यावेळी गिरीश बापट म्हणाले , काँग्रेसवाले 10 वर्ष मेट्रो खालून की वरून यावरच चर्चा करत बसले.आम्ही ती वास्तवात आणली. आता वडगाव शेरीचा माणूस 20 मिनिटात कोथरूडला जाईल. सगळी कामे आम्ही केलीत याचा अभिमान आहे. विकास सामान्यांसाठी करायचा आहे.काँग्रेसने पुण्यातून फक्त घ्यायचे काम केले, दिले काहीच नाही. पुण्याची अवस्था त्यांनी.वाईट केली. वाहतुक कोंडी होते म्हणून ऊद्योग येत नाहीत. आपण ते बदलतो आहोत. मेट्रो रिंग रोड हब तयार करतो आहोत.तसेच पुण्याचे सांडपाणी ट्रीट करणार, ते नदीत जाणार नाही.