शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘चमत्कारी‘ वस्तूंच्या जाहिराती बंद करा

By admin | Published: June 26, 2014 12:47 AM

लोकांच्या धार्मिक भावनांचा फायदा घेत दूरचित्रवाणीवर विविध देवदेवतांच्या नावावर चमत्कारिक वस्तूची जाहिरात केली जात आहे.

नागपूर : लोकांच्या धार्मिक भावनांचा फायदा घेत दूरचित्रवाणीवर विविध देवदेवतांच्या नावावर चमत्कारिक वस्तूची जाहिरात केली जात आहे. यामुळे लोकांची आर्थिक पिळवणूक व धार्मिक विश्वासाचा अवमान होत आहे. याविरुद्ध एका वकिलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. सर्वप्रकारचे दु:ख दूर करण्याचा व मनवांच्छित फळ प्राप्त करण्याचा दावा करणा:या चमत्कारिक जाहिराती बंद करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. न्यायालयाने सरकारी विभागांसह दहा संस्थाना दोन आठवडय़ांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत़ 
काही दूरचित्रवाहिन्यांवर दररोज चमत्कारिक जाहिराती प्रसारित केल्या जातात. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रलयाने यासंदर्भात 25 नोव्हेंबर 1995 पासून ‘केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) अॅक्ट’ लागू केला आहे. चमत्कारिक धार्मिक जाहिराती कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणा:या आहेत. राज्यातील जादूटोणाविरोधी कायदाही पायदळी तुडविला जात असल्याचे अॅड. गीतेश पांडे या याचिकाकत्र्याचे म्हणणो आहे. चमत्कारिक जाहिरातींविरुद्ध याचिकाकत्र्याने 6 मे रोजी राज्य शासनाच्या संबंधित विभागांना निवेदन सादर करून, वादग्रस्त जाहिरातींवर कारवाईची मागणी केली होती. जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अॅडव्हर्टायङिांग स्टॅण्डर्डस् कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आहे. याचिकाकत्र्याने या संस्थेलाही निवेदन दिले होते. यावरून संबंधित वाहिन्यांना नोटीस बजावण्यात आली होती, परंतु वाहिन्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे कौन्सिलने गेल्या फेब्रुवारीत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रलयाला पत्र लिहिले. यानंतरही हनुमान चालिसा यंत्रची जाहिरात सुरू असल्याने मंत्रलयाने काहीच कारवाई केली नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे याचिकाकत्र्याने निदर्शनास आणून दिले आहे.
न्यायमूर्ती भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी मंगळवारी याचिकेवर सुनावणी करताना हे निर्देश दिले. (प्रतिनिधी)