शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

नगर रस्ता बीआरटी बंद करा

By admin | Published: May 21, 2016 12:37 AM

पादचारी सुरक्षिततेच्या उपाययोजना, मार्गाच्या रचनेत झालेल्या चुकांची दुरुस्ती तसेच या मार्गावरील बसचालकांचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे

पुणे : नगर रस्ता बीआरटी मार्गावर पादचारी सुरक्षिततेच्या उपाययोजना, मार्गाच्या रचनेत झालेल्या चुकांची दुरुस्ती तसेच या मार्गावरील बसचालकांचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या रस्त्यावर सुरू करण्यात आलेल्या बीआरटीचे संचलन मार्ग सुरक्षित होईपर्यंत तातडीने बंद करावे, असे गोपनीय पत्र पीएमपी प्रशासनाकडून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या मार्गावर अनेक ठिकाणी त्रुटी असल्याने मार्ग सुरू केल्यापासून गंभीर अपघातांची मालिका सुरू असून गेल्या आठ दिवसांत एका ज्येष्ठ नागरिकाला आपला प्राण गमवावा लागला आहे. तर मार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर गेल्या २० दिवसांमध्ये पीएमपीच्या वाहनांचे ८ ते १० अपघात तर इतर वाहनांचे तब्बल १० ते १२ अपघात झालेले आहेत. त्यामुळे मार्ग सुरक्षित करूनच ही सेवा पुन्हा सुरू करणे सयुक्तिक होणार असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले असल्याची माहिती आहे. दरम्यान, याबाबत पीएमपीचे वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. >या सुधारणा आवश्यक संपूर्ण बीआरटी मार्गासाठी 65 वॉर्डनची आवश्यकतासंपूर्ण बीआरटी मार्गात मुख्य चौक आणि पादचारी रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी गतिरोधक बसविणेबीआरटी लेनमध्ये घुसणाऱ्या इतर सर्व वाहनांवर कडक कारवाई करणेटाटा गार्ड रूम चौकाचे तातडीने रुंदीकरण करून बीआरटी मार्ग पूर्ण करणेटाटा गार्ड रूम चौकाचे तातडीने रुंदीकरण करून बीआरटी मार्ग पूर्ण करणेविमाननगर चौक, जनकबाबा दर्गा परिसरात बॅरिकेडची लांबी वाढविणे रँम्पची उंची वाढविणे तसेच पादचाऱ्यांना भुयारी मार्गाने जाण्याची सक्ती करणे>बीआरटी मार्गावर झालेले अपघातया मार्गावर सुरू असलेल्या अपघातांची मालिका लक्षात घेऊन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पीएमपी प्रशासनास अपघातांची कारणे तसेच त्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पीएमपी प्रशासनाने केलेल्या अहवालात येरवडा ते जनकबाबा दर्गा या बीआरटीच्या ७ किलोमीटरच्या स्वतंत्र कॉरिडोरमध्ये तब्बल १४ अपघात घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच बीआरटी मार्गावर प्रत्येक अर्ध्या किलोमीटरवर पादचारी तसेच प्रवाशांना अपघातांचा धोका आहे.>पर्णकुटी चौक, गुंजन सिग्नल, शास्त्रीनगर चौक, कल्याणीनगर चौक, आगाखान पॅलेस, रामवाडी जकात नाका, पाचवा मैल, टाटा गार्ड रूम, विमाननगर चौक, चंदनगर सिग्नल या ठिकाणी उपाययोजनेची गरज आहे.>जीव महत्त्वाचा, की राजकीय प्रतिष्ठानगर रस्ता बीआरटीचे काम अर्धवट असल्याने या मार्गाच्या उद्घाटनाची घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी केल्यानंतर पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी या मार्गाचे काम पूर्ण झाले नसल्याने उद्घाटनास आक्षेप घेतला होता. मार्गाचे काम अर्धवट असल्याने तसेच चालकांना मार्गावर प्रशिक्षणासाठी १५ दिवस ट्रायल रन घेणे आवश्यक होते. मात्र, त्यानंतर कृष्णा हे सुटीवर गेल्यानंतर त्यांचा पदभार महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे होता. या वेळी कुमार यांनी काम झाल्याचे सांगत उद्घाटनास २५ एप्रिल रोजी हिरवा कंदील दिला. त्यानंतर २६ आणि २७ एप्रिल हे दोन पीएमपीकडून या मार्गावर ट्रायल रन घेण्यात आली. तसेच मार्गाचे काम पूर्ण केले असल्याचे भासवत २९ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, आता हा मार्ग सुरक्षेसाठी बंद करणे आवश्यक असतानाही राजकीय प्रतिष्ठा व या अपघातांचे राजकरण केले जात असल्याची भूमिका घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मार्ग बंद करण्यास विरोध केला जात आहे.