शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

मुंबई-पुणे टोलवसुली बंद करा

By admin | Published: January 31, 2017 12:50 AM

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दिलेल्या कंत्राटाची रक्कम कंत्राटदाराने वसूल केल्याचा दावा चार सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला आहे.

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दिलेल्या कंत्राटाची रक्कम कंत्राटदाराने वसूल केल्याचा दावा चार सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे संबंधित टोलवसुली बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. अन्यथा मुख्यमंत्री आणि सा.बां. मंत्र्यांविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.प्रवीण वाटेगावकर, श्रीनिवास घाणेकर, विवेक वेलणकर आणि संजय शिरोडकर अशी चारही सामाजिक कार्यकर्त्यांची नावे आहेत. यापैकी वाटेगावकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ९१८ कोटी स्वीकारून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट १५ वर्षांसाठी वसुलीसाठी दिले होते. या १५ वर्षांच्या कालावधीत कंत्राटदार २ हजार ८६९ कोटी रुपये जमा करणार असल्याचे नमूद आहे. मात्र ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर होईपर्यंत कंत्राटदाराने एकूण २ हजार ८७६ कोटी रुपये जमा केलेले आहेत. त्यामुळे ठरलेल्या रकमेहून अधिक रक्कम कंत्राटदाराने वसूल केल्याचा दावा वाटेगावकर यांनी केला आहे.याबाबतची सर्व माहिती सरकारकडूनच मिळाली असून त्याबाबत मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेलद्वारे कळविल्याचे वाटेगावकर यांनी सांगितले. शिवाय हा टोलनाका बंद करण्याची विनंती केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत कंत्राटदाराने ११ कोटी रुपये रक्कम जास्त जमा केली असून २०१९ पर्यंत टोलनाका चालू ठेवला तर १ हजार ५०० ते २ हजार कोटी रुपये कंत्राटदाराला अधिक मिळतील, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे येत्या १५ दिवसांत सरकारने याबाबतचा निर्णय घेतला नाही, तर मुख्यमंत्री, सा.बां. मंत्री व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे इतर शासकीय अधिकाऱ्यंविरोधात एसीबीकडे तक्रार दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)