लोकमत न्यूज नेटवर्कबाणेर : सूस रोडवरील नोबेल एक्सचेंज एन्व्हायरमेंट सोल्युशन कंपनीच्या कचरा प्रकल्प प्लॅन्ट विरोधात नागरिकांनी २५० पेक्षा अधिक तक्रारी प्रशासनाकडे करूनही, प्लॅन्टच्या गेटला टाळे ठोकून गेटसमोरील आवारात दगडांचा ढीग ओतत जोरदार आंदोलन करूनही कचरा प्रकल्प प्लॅन्टचा प्रश्न न सुटल्याने आज अखेर नागरिकांनी थेट वर्षा बंगला गाठला आणि हा प्लॅन्ट तातडीने बंद करा या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साकडे घातले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याप्रश्नी लक्ष घालण्याचे आदेश दिले व पुढील आठवड्यात या कचरा प्रकल्पाला भेट देणार असल्याचे जाहीर केले. आयुक्त कुणाल कुमार यांना वारंवार फोन करूनही त्यांना नागरिकांचे फोन घेण्यास वेळ नाही मात्र प्रकल्प चालकांना भेटण्यास त्यांना वेळ आहे. महापालिका प्रशासन नागरिकांना सहकार्य करण्याऐवजी प्रकल्प चालकांना मदत करत असल्याचा थेट आरोप यावेळी नागरिकांनी केला. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे तक्रार दाखल केली असून बोर्डाने प्रकल्प चालकांच्या विरोधात २० जुलै २०१७ च्या आत कडक व तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र कारवाई करण्याचे सोडून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप हे चुकीचे वक्तव्ये करून प्रकल्प चालकांच्या बाजूने भूमिका बजावत असल्याचे यावेळी नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.आमदार मेधा कुलकर्णी या प्रश्नी सातत्याने नागरिकांच्या बाजूने लढा देत असून जिथे हे मुजोर अधिकारी त्यांनाही दाद देत नाही तिथे आम्ही काय करणार ? अशी व्यथा यावेळी नागरिकांनी मांडली.
औंधमधील कचरा प्रकल्प बंद करा
By admin | Published: July 13, 2017 1:06 AM