पुणे : नरेंद्र मोदी यांची गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आयपीएलचे तत्कालीन अध्यक्ष ललित मोदी याने आपल्या एका सहकाऱ्याला ई-मेल पाठविला होता. त्यामध्ये मोदी यांच्याशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत, आपल्याला पाहिजे ते करतील, असा उल्लेख त्यात केला आहे. तो ई-मेल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये उघड केला.ललित मोदी याच्यासंदर्भात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचेही ललित मोदीशी जवळचे संबंध असून त्यांच्या सांगण्यावरूनच सुषमा स्वराज यांनी ललित मोदी याला मदत केल्याची शक्यता चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. सुषमा स्वराज, वसुंधरा राजे व शिवराजसिंह चौहान यांची सखोल चौकशी करण्यात यावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत या तिघांनी राजीनामे देणे आवश्यक आहे. ते राजीनामे देत नाहीत तोपर्यंत तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी आणि ललित मोदी यांचे जवळचे संबंध
By admin | Published: August 27, 2015 2:25 AM