शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

बारामतीतील टोल आकारणी बंद करा

By admin | Published: August 08, 2014 11:19 PM

राज्य शासनाने बारामतीतील दुहेरी टोल आकारणी बंद केली आहे. पण त्याचा बारामती व परिसरातील नागरिकांना फायदा होत नाही.

बारामती : राज्य शासनाने बारामतीतील दुहेरी टोल आकारणी बंद केली आहे. पण त्याचा बारामती व परिसरातील नागरिकांना फायदा होत नाही. शहरातील  पाचही टोलनाक्यांवरून टोलवसुली केली जाऊ नये, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत 15 ऑगस्टर्पयत योग्य ती कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही या वेळी देण्यात आला आहे.
शहरामध्ये मागील आठ वर्षापासून बेकायदेशीररीत्या बारामती व परिसरातील जनतेकडून जबरदस्तीने टोलवसुली  केली जात आहे. येथील रिंग रोडवर झालेला 64 कोटींचा खर्च वसूल होण्यासाठी नगरपरिषदेने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला 22 एकरांचा भूखंड गहाण ठेवला आहे. यातील अतिरिक्त रक्कम पाच टोलनाक्यांद्वारे वसुली केली जात आहे. या 22 एकर जमिनीवर बारामती येथील कचरा डेपो येथून स्थलांतरित करण्यासाठी वारंवार कचरा डेपोला आग लावण्याचे प्रकार सुरू हेाते.बारामतीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनावर बारामती भाजपाचे शहराध्यक्ष अॅड. नितीन भामे, माजी आमदार विजय मोरे, भाजपचे प्रदेश सदस्य दिलीप खैरे, आसिफ खान, ज्ञानेश्वर कौले, अविनाश मोटे, बाळासाहेब कोळेकर, यशपाल भोसले, शिवाजी निंबाळकर, शहाजी कदम, अजित जाधव, सचिन साबळे, अल्ताफ बागवान, अॅड. नितीन अवचट, नितीन मदने, झहीर पठाण, रोहिणी चव्हाण, नीलेश खटके, सुनीता साळुंके, विजया खोमणो, संतोष निलाखे आदींच्या सह्या आहेत. या वेळी पोलिसांनी अॅड. भामे यांच्यासह पदाधिका:यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले. (वार्ताहर)
 
करारच बेकायदेशीर
नगरपालिका व राज्य शासन यांनी कोल्हापूर धर्तीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची थकीत रक्कम भरून जाचक टोलमधून सुटका करावी. जेजुरी, नीरा येथील टोल नाकेही नागरिकांच्या विरोधामुळे शासनास बंद करावे लागले. मध्यंतरी दुहेरी टोल आकारणीचा ‘फार्स’ केला होता. नगर परिषद आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील करारच बेकायदेशीर असल्याने टोलवसुली केली जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.