लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवून आणून संपूण देशात दहशत माजविणाऱ्या सिमीच्या पाच संशयीत दहशतवाद्यांचा भोपाळ आणि तेलंगणामध्ये झालेल्या चकमकीदरम्यान मृत्यू झाल्याने एटीएसने न्यायालयामध्ये खटला बंद करण्यासंदर्भात अंतिम अहवाल सादर केला होता. न्यायालयाने हा अहवाल मान्य करीत खटला बंद करण्यास मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका प्रचारकावर गोळीबार केल्याच्या गुन्ह्यात हे पाचही दहशतवादी खंडवा कारागृहात बंद होते.
फरासखाना तपासाची फाइल बंद
By admin | Published: June 28, 2017 1:55 AM