शहरं
Join us  
Trending Stories
1
"मित्र तोट्यात जाऊ नये म्हणून नाणार प्रकल्पाला विरोध केला"; राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही, माझा एकच शब्द वळसे पाटलांना पराभूत करा'; शरद पवारांनी डागली तोफ
3
निवडणूक अधिकाऱ्यांचा धडाका! ठाकरेंची सलग तीन दिवस, तर शिंदे-फडणवीस-पवार यांची एकाच दिवसात बॅग तपासणी
4
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
5
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
6
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
7
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
8
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
9
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
10
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
11
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
12
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
13
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर
15
“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार
16
ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा
17
"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा
18
"राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी आली तरी..."; मुस्लीम आरक्षणावरून शाह यांचा थेट निशाणा
19
'माझे सरकार पाडले नसते, तर शेतकऱ्यांना कधीच कर्जमाफी दिली असती'- उद्धव ठाकरे
20
"पाच प्रश्नही सांगता येत नाही असा चेहरा कुणाला हवाय?"; सरवणकरांच्या लेकीचा अमित ठाकरेंवर हल्लाबोल

"बंद खोलीवाला मुद्दा"! "...तर यात अडीच वर्ष येतात कुठे? जे केलं ते...; शिंदेंनाही विचारून बघा", राज यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 10:07 PM

"ज्यांचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, हा जर समजा तुमचा फॉर्म्यूला ठरलेला आहे, तर यात हे अडीच वर्ष येतात कुठे? असा सवाल करत, जे केलं ते स्वतःच्या स्वार्थासाठी केलं." असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे."

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी '2019 च्या बंद खोलीवाल्या मुद्द्यावरून' उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. "व्यासपीठावर तुम्ही बसलेले असताना, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सांगितलं की, आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. तुमचे म्हणणे आहे की, चार भिंतींच्या आत आमचं अडीच वर्षांचं ठरलं होतं, मग तुम्ही आक्षेप का नाही घेतला? ज्यांचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, हा जर समजा तुमचा फॉर्म्यूला ठरलेला आहे, तर यात हे अडीच वर्ष येतात कुठे? असा सवाल करत, जे केलं ते स्वतःच्या स्वार्थासाठी केलं." असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.  

'त्या' खोलीच्या मुद्यावर राज ठाकरे टीव्ही९ सोबत बोलताना म्हणाले, "प्रश्न असा आहे की, व्यासपीठावर तुम्ही बसलेले असताना, नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. अमित शाह यांच्या सभेत तुम्ही बसलेले असताना, अमित शाह म्हणाले होते, आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. तुमचं म्हणणं आहे की, चार भिंतींच्या आत आमचं अडीच वर्षांचं ठरलं होतं. मग तुम्ही आक्षेप का नाही घेतला? का नाही बोललात तुम्ही की, हे अडीच वर्षांचं आपलं ठरलेलं आहे, त्याचं काय झालं? तुमच्या समोर पब्लिकली हे झालं ना? 

...तर यात हे अडीच वर्ष येतात कुठे?पुढे राज म्हणाले, "मी तुम्हाला 1989 पासूनची गोष्ट सांगतो, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात जे अंडरस्टँडिंग होतं, ते मी तुम्हाला सांगतो. ज्यांचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री? बरोबर आहे? 1995 ला शिवसेनेचे सर्वाधिक आमदार होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. यानंतर नारायण राणे मुख्यमंत्री झाले. भाजपने केला का दावा? नाही. प्रश्न असा आहे की, तुमचं जे  अंडरस्टँडिंग असेल की, ज्यांचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री. आता हा जर समजा तुमचा फॉर्म्यूला ठरलेला आहे, तर यात हे अडीच वर्ष येतात कुठे?  त्याच्यानंतर तुम्ही सांगायचे की, आम्ही अडीच-अडीच वर्षांचं बोललो होतो आणि त्यांनी कमिटमेंट दिली होती. तुमच्या डोळ्यासमोर ते बोलत होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. अडीच वर्षच असतील, असे नाही बोलले. हे ज्यावेळी निकाल लागले त्याच्यानंतर त्याना हे सर्व सुचलंय." 

तुमच्या बोलण्याचा एकंदरित अर्थ असा निघतो की उद्धव ठाकरे यांनी हे सर्व मुख्यमंत्री पदासाटी केलं? असे विचारले असता राज ठाकरे म्हणाले, "शंभर टक्के"! 

जे केलं ते स्वतःच्या स्वार्थासाठी केलं -पुढे राज म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनाही विचारून बघा. ज्यावेळी काँग्रेसबरोबर ते जात होते, तेव्हा सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे यांना करायला सांगिल्या. जेणेकरून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, असं जवळपास त्यांना सांगितलं होतं. विचारून बघा त्यांना आणि नंतर स्वतः जाऊन बसले. जे केलं ते स्वतःच्या स्वार्थासाठीच केलं." 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा