मुंबई : कामगार कायद्यांतील प्रस्तावित कामगारविरोधी बदलांविरोधात केंद्रीय कामगार संघटनांनी २ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये राज्यातील शिक्षक संघटनांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक शाळा आणि महाविद्यालये शुक्रवारी बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विद्यापीठ, महाविद्यालीन शिक्षक, प्राध्यापक संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या एमफुक्टो, बुक्टो या संघटनांनी संपात सक्रियपणे उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. केंद्र सरकारचे शिक्षणविषयक धोरण सर्वसामान्यांविरोधात असल्याने संपात सामील होत असल्याचे बुक्टोचे उपाध्यक्ष प्रा. बाळासाहेब साळवे यांनी सांगितले. याशिवाय सरकारने हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरवले असून, सरकारी आणि अनुदानित शिक्षण व्यवस्थेला अडचणीत आणल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.एमफुक्टो आणि बुक्टोसह अनुदानित, विनाअनुदानित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेनेही संपात सामील होणार असल्याचे स्पष्ट केले. अनुदानपात्र शिक्षकांना वेतन मिळावे, म्हणून संघटनांनी २ सप्टेंबरलाच धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला शिक्षक आमदारांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या संपात राज्यातील अनेक शिक्षक, प्राध्यापक आणि संस्थाचालक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.
२ सप्टेंबरला शाळा, महाविद्यालये बंद
By admin | Published: August 29, 2016 5:54 AM