शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

सराफांचा पुन्हा तीन दिवस बंद

By admin | Published: April 23, 2016 3:49 AM

अबकारी कर कायद्यातील जाचक अटींवर अद्याप तोडगा न निघाल्याने देशातील सराफांनी सोमवारपासून पुन्हा तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

पुणे : अबकारी कर कायद्यातील जाचक अटींवर अद्याप तोडगा न निघाल्याने देशातील सराफांनी सोमवारपासून पुन्हा तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेने दिलेल्या प्रस्तावातील काही मुद्यांवर अद्याप चर्चा झालेली नाही. बुधवारपर्यंत त्यावर चर्चा होऊन तोडगा निघाला नाही तर पुढेही बंद सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय त्यादिवशी घेतला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे व आॅल इंडिया अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. फत्तेचंद रांका यांनी दिली. अबकारी कराविरोधात देशभरातील सराफांनी १ मार्चपासून जवळपास दीड महिने बेमुदत बंद पुकारला होता. त्यानंतर संघटनेतर्फे केंद्र सरकारला ३४ मागण्यांचा नवीन प्रस्ताव देण्यात आला. त्यानंतर बंद मागे घेऊन सरकाला २४ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली. मागील दहा दिवस केंद्र सरकार व सराफांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेमध्ये सुमारे ७० टक्के मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप काही मुद्यांवर तोडगा निघालेला नाही. यासंदर्भात शुक्रवारी दिल्लीमध्ये देशातील विविध सराफ संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीमध्ये देशपातळीवर आॅल इंडिया अ‍ॅक्शन कमिटीची स्थापना करण्यात आली. अ‍ॅड. फत्तेचंद रांका हे या कमिटीचे अध्यक्ष असणार आहेत.बैठकीत झालेल्या निर्णयाविषयी माहिती देताना अ‍ॅड. रांका म्हणाले, आम्ही एकुण ३४ मुद्दे त्यांच्यासमोर ठेवले होते. त्यातील ६० ते ७० टक्के मुद्यांवर सरकारने सहमती दर्शविली आहे. उर्वरीत मुद्द्यांवर तोडगा निघालेला नाही. तसेच सहमती झालेल्या मुद्यांचे रुपांतर कायद्यात होणे आवश्यक आहे. त्यावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या तीन दिवसांत तोडगा न निघाल्यास पुढील बंंदची दिशा ठरविली जाईल. सोमवारी सराफांचा जंतरमंतरवर मोर्चा काढण्यात येणार आहे.