शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

सराफांचा बंद तात्पुरता मागे

By admin | Published: April 12, 2016 2:48 AM

अबकारी कायद्यातील जाचक अटींविरोधात पुकारलेला बेमुदत बंद मागे घेण्याचा निर्णय सराफी संघटनांनी सोमवारी घेतला असून गुरुवारपासून दुकाने उघडली जाणार आहेत. मात्र, केंद्र सरकारने

पुणे : अबकारी कायद्यातील जाचक अटींविरोधात पुकारलेला बेमुदत बंद मागे घेण्याचा निर्णय सराफी संघटनांनी सोमवारी घेतला असून गुरुवारपासून दुकाने उघडली जाणार आहेत. मात्र, केंद्र सरकारने येत्या २४ तारखेपर्यंत मागण्यांबाबत योग्य निर्णय न घेतल्यास पुन्हा सोन्या-चांदीची दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.देशभरातील सराफांनी मागील दीड महिन्यांपासून दुकाने बंद ठेवून केंद्र सरकारच्या अबकारी कराच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू ठेवले आहे. महाराष्ट्रासह देशभरात अबकारी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी विविध प्रकारे आंदोलन करण्यात आले. देशातील अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेवून आंदोलनाला पाठिंबा मिळविण्यात आला. विविध राजकीय पक्षांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. काही केंद्रीय राज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे सराफ संघटना आतापर्यंत आंदोलनावर ठाम होत्या. मागील आठवड्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत देशभरातील सराफी संघटनांच्या निवडक प्रतिनिधींची अ‍ॅक्शन कमिटी स्थापन करून त्यांना निणर्याचे सर्वाधिकार देण्यात आले. या कमिटीने बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला असून गुरूवारपासून दुकाने उघडली जाणार आहेत.ग्राहक व छोट्या व्यावसायिकांचा विचार करून त्यांच्या हितासाठी बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन व आॅल इंडिया अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. फत्तेचंद रांका यांनी दिली. मंगळवारी केंद्रीय राज्यमंत्री पियुष गोयल व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना कमिटीकडून प्रस्ताव दिला जाणार आहे. त्यावर विचार करण्यासाठी त्यांना २४ एप्रिलपर्यंत मुदत दिली जाईल. या मुदतीत सराफांच्या मागण्यांबाबत योग्य निर्णय न घेतल्यास पुन्हा बेमुदत बंदचा निर्णय घेतला जाईल, असेही रांका म्हणाले. (प्रतिनिधी)