वरवंड : कोपर्डी येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ वरवंड गावाने बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदविला.कोपर्डी येथील घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेच्या निषेधार्थ वरवंडमध्ये निषेधसभा घेण्यात आली. या सभेचे आयोजन ग्रामस्थ केले आहे. या सभेमध्ये ग्रामस्थांनी निषेध नोंदविला. या वेळी गावचे पोलीस पाटील किशोर दिवेकर म्हणाले, की कोपर्डी गावामध्ये घटलेली घटना ही समाजाला काळिमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी. आपले गाव तालुक्याचा दृष्टीने शिक्षणाबाबत महत्त्वाचे मानले जाते. या गावामध्ये बाहेरगावातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांनी प्रवास करताना शासकीय वाहनातून म्हणजे एसटीमधून प्रवास करावा तसेच आपल्या विद्यालयामध्ये पासची सोय केली असल्यामुळे तुमचा पास काढण्यासाठीचा वेळ वाचणार आहे.तसेच, १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पालकांनी गरज असली तरच साधा मोबाईल देणे गरजेचे आहे. या मोबाईलचा दुरुपयोग वाढला आहे. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांना ओळखपत्र देणे गरजेचे आहे. या वेळी सरपंच संजय खडके, अशोक फरगडे, गणपत दिवेकर, बापू कचरे, बापू बारवकर, राजेंद्र देशमुख, नानासो दिवेकर, बाळासो जगताप, प्राचार्य के. डी. वणवे, केंद्रप्रमुख वसंत कुतवळ, सतीश राऊत, विजय दिवेकर, गुणाजी रणधीर, राजेंद्र दिवेकर उपस्थित होते.>विविध संघटनांचे आंदोलनगुन्हेगाराला जातधर्म नसतो; तो असतो फक्त गुन्हेगार. यामुळे या गुन्हेगारांना कठोर शिक्षा करणे गरजेचे आहे. या घटनेचा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दिवेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली.
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ वरवंड बंद
By admin | Published: July 23, 2016 1:49 AM