शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

गृहरक्षक दलाची साप्ताहिक परेड बंद

By admin | Published: January 22, 2015 10:53 PM

कोल्हापूर जिल्ह्यात अकराशे होमगार्ड आहेत. यांचा शासनाकडे ५० ते ५५ लाख रुपये कर्तव्य भत्ता थकीत आहे.

निधीची कमतरता : जिल्हा मुख्यालयांना आदेश; कोल्हापूर जिल्हा समादेशक पदही रिक्त; एक हजार कर्मचारीप्रकाश पाटील ल्ल कोपार्डेपोलिसांना दंगलीच्या अथवा आपत्कालीन परिस्थितीत मदत व्हावी या उद्देशाने तत्कालीन पंतप्रधानमोरारजी देसाई यांनी ६ डिसेंबर १९४६ रोजी गृहरक्षक दलाची (होमगार्ड) स्थापना केली होती. हे दल संपूर्णपणे मानसेवी असून, यामध्ये समाजातील विविध घटकांतील लोक आपला सहभाग ठेवून शासनाला म्हणण्यापेक्षा पोलीस दलाला मदत करीत होते. यात सण, निवडणुका, पूर, दंगली, यांसह आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य करून आपले योगदान देत असत. गृहरक्षक दलाला शिस्त आणि कर्तव्याचे शिक्षण देण्यासाठी आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक कवायत व परेड दिली जात असे. मात्र, अलीकडेच राज्यातील गृहरक्षक (होमगार्ड) दलाच्या जिल्हा मुख्यालयांना साप्ताहिक परेड बंद करण्याचा आदेश १२ डिसेंबर २०१४ ला आल्यापासून ती बंद करण्यात आली असल्याने गृहरक्षक दलाला मरगळ येणार आहे. मुंबई प्रांत व परिसरात उसळलेल्या जातीय दंगलीनंतर पोलीस दलाला सामाजिक सुरक्षितता व संरक्षण देणे अवघड होऊन बसले. यामुळे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मानसेवी संघटना म्हणून गृहरक्षक दलाची स्थापना केली. अलीकडे शासनाने पोलीस दलात होमगार्ड असणाऱ्या उमेदवाराला पोलीस व संरक्षण दलातील भरतीवेळी आरक्षण दिल्याने व कर्तव्य भत्त्यातही ४०० रुपयांपर्यंत वाढ केल्याने युवकांचा गृहरक्षक दलात भरती होण्याकडे कल वाढला होता. बऱ्याच बेरोजगार युवकांना गृहरक्षक दल हा रोजगारासाठी काडीचा आधार होता. मात्र, अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणूक, नवरात्र व ईद सणाचा भत्ताच या होमगार्डस्ना मिळाला नसल्याने आधीच आर्थिक तंगीत असणाऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अकराशे होमगार्ड आहेत. यांचा शासनाकडे ५० ते ५५ लाख रुपये कर्तव्य भत्ता थकीत आहे.जिल्हा समादेशक पदच रिक्तकोल्हापूर जिल्ह्यासाठी असणारे गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशकपद गेली दीड वर्षे रिक्त आहे. विलासराव पाटील (कौलवकर) हे नोव्हेंबर २०१३ मध्ये पदमुक्त झाले. त्यानंतर हे पद एक वर्षे रिक्त होते. सध्या या पदाचा प्रभारी पदभार नियंत्रण कक्ष कसबा बावड्याकडे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे अरुण पवार यांच्याकडे दिला गेला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक दर्जा असणारे जिल्हा समादेशकपद पोलीस निरीक्षकांकडे दिल्याने या गृहरक्षक दलाबद्दलची शासनाची उदासीनता लक्षात येते.कर्तव्य भत्त्याची बिले लवकरच ट्रेझरीकडे पाठवून गृहरक्षकदलातील कर्मचाऱ्यांना भत्ता देणार आहे. १२ डिसेंबर २०१४ ला महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासमादेशकांकडून साप्ताहिक परेड बंदचा आदेश दिला आहे. - एम. जे. शिंदे, वरिष्ठ लिपिक