ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 20 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौ-यास २४ तास होण्याआधीच म्हैसाळ सिंचन योजनेची वीज शनिवारी दुपारी चार वाजता तोडण्यात आली. ऐन उन्हाळ्यात पाण्याची गरज असताना ‘म्हैसाळ’चे आवर्तन बंद झाले आहे. ९ कोटी ६० लाख रुपये थकबाकीसाठी महावितरणने ही कारवाई केली आहे. योजनेची एप्रिलअखेरची एकूण थकबाकी १८.५ कोटी आहे. वीज तोडण्यामुळे उन्हाळ्याचा शेवटचा कालावधी शेतक-यांसाठी खडतर जाणार आहे.
या योजनेची एप्रिलअखेरची १८.५ कोटी रुपये थकबाकी होती. त्यानंतर मे महिन्यातील २० तारखेपर्यंतचे ३ कोटी असे एकूण २१.५ कोटी रुपये थकबाकी आहे. यामधील ९ कोटी ६० लाख रुपये तात्काळ भरणे आवश्यक होते. तसा इशारा महावितरणने पाटबंधारे विभागाला दिला होता. थकित बिल भरण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने शेतक-यांना केले होते. परंतु पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही आणि साखर कारखान्यांनीही पैसे भरण्यासाठी उत्सुकता दाखविली नसल्याने अखेर पाटबंधारे विभाग हतबल झाला. थकित वसुली कोंडीत सापडली. त्यामुळे अखेर २० मेरोजी चार वाजता म