शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

कल्याण, मीरा-भार्इंदरमध्येही आता क्लस्टर डेव्हलपमेंट

By admin | Published: June 12, 2014 4:30 AM

मुंबई आणि ठाण्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली तसेच मीरा-भार्इंदर महापालिकेतही क्लस्टर पद्धतीने गृहनिर्माण योजना राबविण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

मुंबई : मुंबई आणि ठाण्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली तसेच मीरा-भार्इंदर महापालिकेतही क्लस्टर पद्धतीने गृहनिर्माण योजना राबविण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुंबईनंतर ठाणे, नवी मुंबई आणि सिडकोच्या क्षेत्रात क्लस्टर पद्धतीने गृहनिर्माण योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हीच पद्धत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातही राबवावी, अशी मागणी संजय दत्त यांनी केली. भाई जगताप यांनी या मागणीला पाठिंबा देताना संपूर्ण एमएमआरडीएच्या क्षेत्रातच ही पद्धत राबविण्याची मागणी केली.त्याला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी सांगितले, की ठाणे, नवी मुंबई व सिडकोमध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे तेथे राबविण्यात येत असलेल्या क्लस्टर पद्धतीची यशस्विता पाहून कल्याण-डोंबिवलीमध्ये ही पद्धत राबविण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.त्यावर संजय दत्त यांनी कल्याण-डोंबिवलीबाबत सापत्नभाव का, असा सवाल केला. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी उत्तरात हस्तक्षेप केला. मुंबईत बहुतांश इमारती अधिकृत आहेत. जुन्या, धोकादायक पण अधिकृत इमारतींबाबत क्लस्टर योजना वेगळी आहे. ठाण्यात बहुसंख्य इमारती अनधिकृत आहेत. त्यामुळे तेथे क्लस्टर पद्धत राबविण्यासाठी वेगळे मापदंड आहेत. नवी मुंबई, ठाणे आणि सिडकोमध्ये क्लस्टर पद्धत राबविण्याच्या धोरणाबाबत लोकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. येत्या १७ जूनपर्यंत त्या येणार आहेत. त्यानंतर अंतिम अधिसूचना जारी होईल. साधारण १५ दिवसांचा वेळ यास लागेल. त्यानंतर कल्याण-डोंबिवली तसेच मीरा-भार्इंदर महापालिकांबाबत नक्कीच विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)