शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी वि. हिंदीची धग इंग्रजीपर्यंत जाऊन पोहोचली; डोंबिवलीत वाद, तीन तरूणींना मारहाण
2
“लोकांना आता आपल्या शिवसेनेची गरज, परत कोकण पादाक्रांत करणार, कोण मधे येतो बघू”: उद्धव ठाकरे
3
मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचे ९ मोठे निर्णय; वाळू-रेती धोरण, सिंधी समाजासाठी अभय योजना!
4
एका ट्विटमुळे जगभरातील शेअर बाजारात खळबळ! गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
5
मोठी बातमी! वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत; पंढरपुरातील चाचणी यशस्वी
6
दिशा सालियानच्या वकिलाची न्यायमूर्तींवर वादग्रस्त टिप्पणी; अवमान केल्याप्रकरणी हायकोर्टाने सुरु केली कारवाई
7
जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनंतर न्याय, ४ दहशतवाद्यांना जन्मठेप; झाला होता ७१ जणांचा मृत्यू
8
“आमचा पक्ष राहावा की नाही हे आता भय्ये ठरवणार का?”; सुप्रीम कोर्टातील याचिकेवर मनसे आक्रमक
9
भारीच! लग्नासाठी पैसे नाही तर मोफत कपडे देणारी 'ड्रेस बँक'; टॅक्सी ड्रायव्हरने दिला मदतीचा हात
10
सर्वोच्च न्यायालयात 'या' तारखेला होणार वक्फ कायद्याविरोधातील सर्व याचिकांवर सुनावणी
11
आधीच ट्रम्प टॅरिफमुळे खळबळ, त्यात अमेरिकेत 'जंक बाँड' विक्री जोरात; मंदीच्या दिशेने वाटचाल?
12
एका रात्रीत कसा बदलला गेम? शेअर बाजाराची जोरदार उसळी? 'ही' आहेत ५ कारणे
13
पात्रतेच्या आधारे नोकऱ्या मिळतात, उपकार करत नाही; मनसेच्या आंदोलनाचा विषय संसदेत गाजला
14
बॉक्सर मेरी कोमचा घटस्फोट होणार? तीन वर्षांपासून नात्यात दुरावा, पती-पत्नीचे वेगवेगळे बिऱ्हाड
15
सोन्याचं डोरले महिलेला आवडले; पुण्याच्या सराफाला 'हनीट्रॅप'मध्ये अडकवत २७ लाख लुटले
16
Astro Tips: नोकरी-व्यवसाय-शिक्षणात यशस्वी होण्यासाठी बुधवारी करा 'हे' गणेशउपाय!
17
नववर्षाचा पहिला गुरु प्रदोष: ६ मूलांकांना अपार लाभ, सुख; दत्तगुरु-स्वामी-महादेव शुभ करतील!
18
Gold Price Today: सोन्या चांदीचे दर आज परत घसरले, ५० हजारांपर्यंत येण्याची वाट पाहायची का?
19
ओलाने फेब्रुवारीत असा आकडा फुगविला; रोडस्टर अद्याप रस्त्यावर आली नाही ती विकल्याचे दाखविले...
20
"हो, मी हनुमानाची भूमिका साकारणार...", सनी देओलची 'रामायण' सिनेमावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया

"महाराष्ट्रातल्या मोठ्या वक्फ घोटाळ्यात काँग्रेसचे बडे नेते"; CM फडणवीसांनी दिले कारवाईचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 08:45 IST

महाराष्ट्रातल्या मोठ्या वक्फ जमीन घोटाळ्यावर सरकार लवकरच कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

CM Devendra Fadnavis on Waqf Amendment Bill 2025: शुक्रवारी सकाळी संसदेत जोरदार चर्चेनंतर वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकावर लोकसभा आणि राज्यसभेत जोरदार चर्चा झाली. त्यानंतर बहुमताने वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यानंतर आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठण्यात येणार आहे. त्यानंतर याचे कायद्यात रुपांतर होईल. दुसरीकडे, महाराष्ट्रात मोठा वक्फ जमीन घोटाळा झाला असून यासंदर्भात आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर कारवाई करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

गुरुवारी लोकसभेनंतर राज्यसभेतही बहुमताने वक्फ दुरूस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली तर विरोधात २३२ एवढी मतं पडली.  अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत हे विधेयक मांडले होते. एआयएमआयएम आणि काँग्रेसच्या खासदारांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे घटनात्मक तरतुदींच्या विरोधात असल्याचे म्हणत सभागृहातील हा लढा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या विधेयकाविरोधात अनेक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलनही करत आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रातल्या वक्फ घोटाळ्यावर महाराष्ट्र सरकार कारवाई करणार असल्याचे द हिंदूला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

'जीव देऊ, पण दुरुस्ती मान्य करणार नाही', वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिम संघटना रस्त्यावर

२००० ते २०१४ दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या मोठ्या वक्फ जमीन घोटाळ्यावर महाराष्ट्र सरकार लवकरच कारवाई करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. वक्फ दुरुस्ती विधेयकाचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. वक्फचे दुरुस्ती विधेयक  लोकशाहीवादी, समाजवादी प्रजासत्ताक भारताच्या घटनात्मक भावनेशी सुसंगत असून समाजाच्या फायद्यासाठी हे विधेयक मंजूर करण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  जर मालमत्ता अल्लाहच्या नावावर असेल तर ती पारदर्शक असली पाहिजे आणि ती लोकांच्या हितासाठी वापरली जावी, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

"संपूर्ण वक्फची जमीन काँग्रेसने बळकावली आहे. २००० ते २०१४ या काळात मोठा घोटाळा झाला. काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांची त्यात नावे होती. मी विधानसभेतही हा मुद्दा मांडला होता. न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने ही जमीन या नेत्यांनी बळकावल्याचा अहवाल दिला होता. आता या प्रकरणी आम्ही कारवाई करणार आहोत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या घोटाळ्यात सहभागी असलेल्या काँग्रेस नेत्यांच्या नावांबद्दल विचारले असता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नावे आठवत नाहीत, परंतु अनेक प्रमुख नेत्यांची नावे होती, असं म्हटलं. 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रcongressकाँग्रेस