मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन वादळी आणि ऐतिहासिक ठरले. या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजुरी देण्यात आली.
विशेष, म्हणजे अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणादरम्यान कविता सादर केला. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेसह विरोधकांवर निशाणा साधला. तसेच, त्यांना आपल्या कवितेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्ष यात्रेवर सुद्धा टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या या कवितेला सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही दाद दिली.
याचबरोबर, शिवसेना आपले मुखपत्र सामनामध्ये काय भूमिका मांडते. यावरून सामना सरकार चालवत नाही. मी सरकार चालवतो, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. तसेच पुढचाही मुख्यमंत्री मी असेल आणि याच कार्यक्रमाला हजर राहणार आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची कविता...
"माझ्यावर टीकेची करून कामनाविखे पाटील वाचतात सामनासंघर्ष यात्रेला लाभेना गर्दीम्हणून त्यांच्या घरी वर्तमानपत्रांची वर्दीजनता जनार्दन आमच्याच बाजूलाआणि तुमची खुर्ची असेल 'त्याच' बाजूला2019 चा महासंग्राम आला जवळ बाजी मारणार सेनेचा बाण अन् भाजपचे कमळ!"