चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 09:00 PM2024-10-14T21:00:43+5:302024-10-14T21:01:13+5:30
सिनेमा तसंच राजकीय क्षेत्रातून अतुल परचुरेंना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
रसिकांना खळखळून हसवणारे मराठीतील हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सिनेमा तसंच राजकीय क्षेत्रातून अतुल परचुरेंना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी ट्वीट करत भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्वीट
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एग्झिट : "रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली दैदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले.मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही. परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक या नात्याने कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो. राज्य सरकारच्या वतीने मी त्यांना श्रध्दांजली वाहतो. ओम शांती."
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एग्झिट :
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 14, 2024
रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका… pic.twitter.com/RqvCuXSmCn
अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीट करत आदरांजली वाहिली आहे.
मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या विनोदी भूमिकांमार्फत त्यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये आपली जागा निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने सिनेमाजगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे… pic.twitter.com/9fv8cKBF2f
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 14, 2024
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत वाहिली आदरांजली
मराठी रंगभूमीसह मालिका-चित्रपट आणि हिंदी मनोरंजन सृष्टीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनानं एक प्रतिभावंत, हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचं निधन ही मराठी कला विश्वाची खूप मोठी हानी आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनय… pic.twitter.com/uswpAVY2AD
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 14, 2024
खासदार श्रीकांत शिंदे यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.
मराठी अभिनयातील अष्टपैलू आणि सशक्त अभिनेता अशी ओळख मिळवलेल्या ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी माझ्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक रसिक मनाला धक्का देणारी आहे. आपल्या निखळ अभिनयाच्या जोरावर नाटक, मराठी, हिंदी चित्रपट आणि छोटा पडदा गाजवलेले अष्टपैलू अभिनेते अतुल… pic.twitter.com/mutl89alSA
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) October 14, 2024
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ट्वीट
लोकप्रिय अभिनेते आणि हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांचे निधन संपूर्ण कलाविश्वासाठी अतिशय दु:खद बातमी आहे.
— Nana Patole (@NANA_PATOLE) October 14, 2024
मराठी-हिंदी नाटक, सिनेमा, मालिका, जाहिराती अशा विविध प्रकारांमध्ये आपली छाप पाडणाऱ्या अतुल परचुरे यांनी नानाविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या दु:खद प्रसंगाचा… pic.twitter.com/TbUfBH6aLI
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे ट्वीट
मराठी मनोरंजन विश्वातील हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 14, 2024
आपल्या विनोदी आणि दर्जेदार अभिनयाने मागील अनेक वर्ष त्यांनी माझ्यासारख्या कोट्यवधी रसिकांचे मनोरंजन केले. आज त्यांच्या निधनानं अष्टपैलू अभिनेता महाराष्ट्राने गमावला आहे. या कठीण प्रसंगी त्यांच्या… pic.twitter.com/OXClm7RhdI
अमोल कोल्हे यांनी वाहिली आदरांजली
अभिनय क्षेत्रातील माझे सहकारी व मित्र, आपल्या कसदार अभिनयाने मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे, मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीत ही आपल्या कलेचा ठसा उमटवणारे चतुरस्त्र अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे.
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) October 14, 2024
बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर नाटक,… pic.twitter.com/rpXLmniYZz