शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

CM Eknath Shinde Birthday: शिंदे साहेब... जीवाला जीव देणारे नेते!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 11:53 AM

आपल्या केवळ सहा महिन्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीत राज्याच्या हिताचे धडाकेबाज निर्णय आणि कृतीतून कायमच सर्वांच्या आदरस्थानी असलेले आणि प्रसंगी आमच्यासारख्या सामान्य सहकार्याच्या जीवाला जीव देणारे महाराष्ट्राचे एकमेव लोकप्रिय, लाडके मुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय ना. एकनाथजी शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस....! त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा...!

शंभूराज शिवाजीराव देसाई. मंत्री (राज्य उत्पादन शुल्क ): महाराष्ट्र राज्य.पालकमंत्री सातारा, ठाणे जिल्हा -

सन्माननीय शिंदे हे केवळ राजकारणी, स समाजकारणी नाहीत तर ते उत्तम उद्योजक, प्रयोगशील शेतकरी आहेत. सामाजिक जीवनात वावरताना प्रॅक्टिकल विचार करुन त्याला कृतीची पूरक जोड देणारी जी काही मोजकी नेतेमंडळी आहेत, त्यात शिंदेसाहेबांचा अव्वल क्रमांक लागतो. आपल्या मंत्रिपद कार्यकाळात कोरोना संकटाच्या काळ असो अथवा आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या केवळ सहा महिन्यांतील कार्यकाळ असो. कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता ते महाराष्ट्रासाठी ज्या तळमळीने, तडफेने कामे करतात त्याला तोड नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येकाला त्यांच्या प्रती जिव्हाळा, आदर, आपलेपणा वाटतो.

कोणतीही विकासकामे साकारताना त्यांनी कधी पक्षीय भेद न करता महाराष्ट्रभर विकासाचे जाळे निर्माण केले प्रसंगी विचारधारा जरी भिन्न असल्या तरी एकमेकांप्रती आदर, मैत्री, जिव्हाळा, आपुलकी सांभाळण्याची आणि जपण्याची आपल्या महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक परंपरा आहे. शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे संस्कार साहेबांनी आपल्या कृतीतून महाराष्ट्रात रुजवले. त्याच संस्काराच्या शिदोरीवर आमच्यासारखे कार्यकर्ते काम करत आहेत. तोच खरा महाराष्ट्राच्या मातीचा संस्कार आहे. त्याला अहंकाराचा, खुनशीपणाचा वास नाही. त्यामुळे माननीय साहेबांच्यात रुजला तो महाराष्ट्राच्या मातीतला संस्काराचा गुण आहे.शिंदे आता जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असले तरी राज्याच्या विधीमंडळात सहकारी म्हणून २००४ पासून आम्ही एकत्र काम करीत आहे. सन २००४ मध्ये एकाच वेळी आम्ही दोघे ही विधानसभेवर निवडुन आलो तेव्हापासून च नव्हे तर त्यापूर्वी पासून शिवसेनेमध्ये माझे आणि शिंदे साहेबांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि आजही ते तेवढेच जिव्हाळ्याचे आहेत.

सत्ता असो अथवा नसो सत्तेत असताना अहंकार आणि विरोधी पक्षात असताना एकारलेपणा, अक्रस्ताळेपणा मला त्यांच्यात कधीही जाणवला नाही. मैत्री कशी जपावी? सहकाऱ्यांशी कसा स्नेह ठेवावा? हे कुणाकडून शिकावे तर केवळ माझ्यासमोर केवळ एकच आदर्श व्यक्तिमत्त्व उभे राहते ते आदरणीय शिंदे साहेबांचे..! एवढेच नव्हे तर अगदी जीवाला जीव देणारे व्यक्तिमत्त्व कोण आहे ? या प्रश्नाचे उत्तर कोणी विचारले तर ते देखील केवळ आणि केवळ एकच नाव माझ्या डोळ्यासमोर येईल ते म्हणजे शिंदे यांचेच. आणि ही केवळ माझीच भावना नाही तर या राज्याच्या, आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेकांची माझ्यासारखी हीच भावना असेल यात तिळमात्र शंका नाही.

संकटकाळात कोणीही, कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही केलं पाहिजे. मदतीच्या कामांचा दिखावा केला नाही पाहिजे. अनावश्यक प्रसिद्धी केली नाही पाहिजे, प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असं आपल्या कार्यकर्त्यांना रोखठोकपणे सांगणारे सन्माननीय शिंदे त्यामुळेच वेगळे ठरतात. त्यांचा हा रोखठोक सल्ला राजकीय, सामाजिक जीवनात काम करणाऱ्या प्रत्येकालाच अंतर्मुख करणारा आहे. दिशा देणारा, मार्गदर्शन करणारा आहे. 

शिंदे हे स्पष्टवक्ते आहेत. विकासाची दृष्टी असणारे आणि त्या दृष्टीला कृतीची जोड देणारे नेते आहेत. त्यामुळेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या कामांचा आलेख ठळकपणाने दिसतो. त्यासाठी स्वतंत्रपणे प्रसिद्धी करण्याची गरज लागत नाही. मंत्रिमंडळात त्यांच्याबरोबर काम करत असताना सन्माननीय साहेबांचे फार मोलाचे मार्गदर्शन मिळते. महाराष्ट्राच्या तळागाळातील समस्या, प्रश्न यांबरोबर विकासकामांवरही साहेबांचे बारकाईने कसे लक्ष असते, प्रत्येक विषयाला ते नेहमीच कसे सकारात्मकतेने, संवेदनशीलपणे प्रतिसाद देतात हे या निमित्तानं विशेषत्वाने नमूद करावेच लागेल आणि हे माझ्या सारख्या कार्यकर्त्यांला खऱ्या अर्थाने आणखी मिळालेली शिदोरी समजतो.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मातीशी घट्ट नाळ असलेला हा संवेदनशील आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला नेता राज्याचा डोलारा सांभाळताना आपल्या कर्मभूमी आणि मायभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील गल्ली पासून वाडी वस्तीवरील विकासाच्या प्रश्नांची सोडवणूक करताना ही तेवढ्याच तडफेने तत्पर असतो हे नम्रपणे नमुद करावे लागेल आणि त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे हे माझे मी भाग्य समजतो. त्यांच्या या सहकार्याच्या संवेदनशीलतेच्या भावनेमुळेच महाराष्ट्रात ते अत्यंत लोकप्रिय आहेत.त्यांच्या वागण्या बोलण्यात सातारी कणखर बाणा असला तरी ते मोठ्या मनाचे नेते आहेत. त्यामुळेच केवळ पश्चिम महाराष्ट्रात च नाही तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही त्यांच्याबद्दल प्रत्येकाला आपुलकी, आपलेपणा वाटतो. सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्यात कधीही अहंकार, आत्मपौढी दिसत नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. 

नवतंत्रज्ञानाचे आणि आधुनिकतेचे आचरण करणारे शिंदे आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर महाराष्ट्रभर आपल्या कीर्तीचा सुगंध पसरवत आहेत. राज्यात प्रत्येकाला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. नवकल्पनांच्या जोरावर आणि धडाकेबाज कृतीतून त्यांच्या हातून राज्याची अशीच सेवा निरंतर घडो, त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच त्यांच्या वाढदिनी माझी प्रार्थना!

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्री