"CM शिंदे, फडणवीस, अजित पवार विनिंग कॉम्बिनेशन; ...तर दुसऱ्यांना निवडण्याचे कारणच नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 03:55 PM2023-11-06T15:55:20+5:302023-11-06T15:56:06+5:30
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, हे जे काही कॉम्बिनेश आहे, हे विनिंग कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी महायुतीचाच विजय दिसणार, असे म्हटले आहे."
राज्यातील 2359 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. यात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी जबरदस्त आघाडी घेतली आहे. तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेला (ठाकरे गट) मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. या निवडणुकीसंदर्भात विचारले असता, भाजप आमदार नितेश राणे यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, हे जे काही कॉम्बिनेश आहे, हे विनिंग कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी महायुतीचाच विजय दिसणार, असे म्हटले आहे.
हे विनिंग कॉम्बिनेशन आहे -
महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या. या निकालवरून लोकांनी असा संदेश दिला आहे की, तुम्ही तिघांनी एकत्रिय येणे आम्ही स्विकारले आहे. तुम्ही तिघे एकत्रित आलात म्हणजे, तुम्ही महाराष्ट्राचा विकास करू शकता. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, हे जे काही कॉम्बिनेश आहे, हे विनिंग कॉम्बिनेशन आहे. यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने ग्रामपंचायत निवडणुकीवर झेंडा फडकताना दिसला, त्याच पद्धतीने आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीतही महायुतीचेच कॉम्बिनेश चालताना दिसेल आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला महायुतीचाच विजय दिसणार, असा माझा ठाम विश्वास आहे.
...तर दुसऱ्यांना निवडण्याचे काही कारणच नाही -
राणे साहेब आज भारतीय जनता पक्षात आहेत. आमचे रवी चव्हाणजी कार्यकर्त्यांना मोठा प्रमाणावर ताकद देत आहेत आम्ही एकमेकांना ताकद देऊन. तळागाळातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जनतेचा विश्वास संपादन करत आहोत. आज केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी येत आहे. माझ्या एकट्याच्या मतदार संघात दोन हजार कोटीं पेक्षाही अधिक निधी आला आहे. आता लोकांना विकासापेक्षा आणखी काय हवं आहे? आणि तेच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सरकार देत असेल, तर दुसऱ्यांना निवडण्याचे काही कारणच नाही, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.
महायुती शिवाय पर्याय नाही -
राणे म्हणाले, सिंद्धुदुर्गचा विकास भाजप आणि महायुती सरकारच करत आहे, दुसरं निधी कोण आणत आहे? आमच्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्तेय एकत्रितपणे लोकांची सेवा करत आहेत. मला विश्वास आहे की, यापूढच्या कोणत्याही निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकारशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही.