04 Jul, 22 09:28 PM
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पन्नास आमदारांसह शक्ती स्थळावर दाखल.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पन्नास आमदारांसह शक्ती स्थळावर दाखल.
04 Jul, 22 09:17 PM
एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल; बसवर मोठा हार, कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत
एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल; बसवर मोठा हार, कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत
04 Jul, 22 07:54 PM
मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदारही शिवाजी पार्कवर दाखल. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन.
मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदारही शिवाजी पार्कवर दाखल. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन.
04 Jul, 22 06:52 PM
शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट होते. जास्त बोलले तर इतरांसारखेच होईल. आम्ही अडीच वर्षे सरकार चालवू. - एकनाथ शिंदे.
शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट होते. जास्त बोलले तर इतरांसारखेच होईल. आम्ही अडीच वर्षे सरकार चालवू. - एकनाथ शिंदे.
04 Jul, 22 06:52 PM
व्हीपचे उल्लंघन केलेल्यांवर कारवाई करणार - एकनाथ शिंदे.
व्हीपचे उल्लंघन केलेल्यांवर कारवाई करणार - एकनाथ शिंदे.
04 Jul, 22 06:51 PM
आम्हाला १६४ आणि विरोधकांना ९९, म्हणजे शंभरीही गाठता आलेली नाही. अधिवेशनाची पुढची तारीख ठरवू. - एकनाथ शिंदे.
आम्हाला १६४ आणि विरोधकांना ९९, म्हणजे शंभरीही गाठता आलेली नाही. अधिवेशनाची पुढची तारीख ठरवू. - एकनाथ शिंदे.
04 Jul, 22 06:51 PM
१८ जुलैला राष्ट्रपती निवडणूक असल्याने पावसाळी अधिवेशन घेणे कदाचित शक्य होणार नाही - देवेंद्र फडणवीस
१८ जुलैला राष्ट्रपती निवडणूक असल्याने पावसाळी अधिवेशन घेणे कदाचित शक्य होणार नाही - देवेंद्र फडणवीस
04 Jul, 22 06:51 PM
शिंदेच स्वत: ठाण्याच्या सभेत म्हणालेले की माझ्या खिशात राजीनामा आहे. - अजित पवार.
शिवसेनेनेच सांगितलेले की आमची २५ वर्षे सडली. शिंदेच स्वत: ठाण्याच्या सभेत म्हणालेले की माझ्या खिशात राजीनामा आहे. - अजित पवार.
04 Jul, 22 06:51 PM
आज मी कोणाकोणाला किती निधी दिला हे सांगितले. - अजित पवार.
उद्धव ठाकरेंच्या कानावर आम्ही काही गोष्टी घातल्या. मी निर्णय घेतो, असे ते म्हणालेले. शिंदे परत येण्याआधी मी काही बोलणे उचित नव्हते. यामुळे आज मी कोणाकोणाला किती निधी दिला हे सांगितले. - अजित पवार.
04 Jul, 22 06:50 PM
शिंदे बोलत होते, बोलत होते, पण तिकडे फडणवीस घाबरलेले; अजित पवारांनी नेमके तेच हेरले
शिंदे बोलत होते, बोलत होते, पण तिकडे फडणवीस घाबरलेले; अजित पवारांनी नेमके तेच हेरले
04 Jul, 22 06:47 PM
अडीच वर्षे मी विरोधी पक्षनेता, अडीच तुम्ही; अजित पवारांसोबत तेव्हाच ठरले होते - देवेंद्र फडणवीस.
अडीच वर्षे मी विरोधी पक्षनेता, अडीच तुम्ही; अजित पवारांसोबत तेव्हाच ठरले होते - देवेंद्र फडणवीस.
04 Jul, 22 04:13 PM
मी पाठिशी पहाडासारखं उभा आहे असं आश्वासन अमित शाह यांनी दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
04 Jul, 22 04:11 PM
तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करा आणि राज्याला प्रगतीपथावर न्या, असं पंतप्रधान मोदींनी मला फोन करुन सांगितलं- एकनाथ शिंदे
04 Jul, 22 04:07 PM
सत्तेचा वापर सर्वसामान्याला झाला पाहिजे. लिखापढी करत नाही, आता थेट आदेश देतो- एकनाथ शिंदे
04 Jul, 22 04:06 PM
आम्हाला शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र घ्यावं लागत नाही. सत्तेचा फायदा शिवसेनेला व्हायला हवा होता. पण तो झाला नाही. राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्याच मतदार संघात पुढचा आमदार राष्ट्रवादीचा होईल असे दावे केले जात होते- एकनाथ शिंदे
04 Jul, 22 03:54 PM
"कामाख्या देवीनं आता कुणाचा बळी घेतला. ४० रेडे पाठवले पण जो बोलला तो रेडा आम्हाला नको. सहन करण्याची पण काही सीमा असते. आम्ही रडत होतो", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
04 Jul, 22 03:47 PM
दादांचे धन्यवाद ते मंत्रालयात ७ वाजताच यायचे, एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा
04 Jul, 22 03:25 PM
मी स्वत: १६ लेडीज बार तोडले, माझ्यावर १०० हून अधिक केसेस दाखल आहेत. हे सारं कुणासाठी केलं?- एकनाथ शिंदे
04 Jul, 22 03:23 PM
मुलांच्या आठवणीनं एकनाथ शिंदे भावूक
अपघातात गमावलेल्या दोन मुलांच्या आठवणीनं एकनाथ शिंदे भावूक झाले. "शिवसेनेसाठी रक्ताचं पाणी केलं. माझी दोन मुलं मी गमावली तेव्हा खचून गेलो होतो. आनंद दिघेंनी मला पुन्हा उभं केलं. मी खूप मेहनत केली. दिघेंमुळे पुन्हा शिवसेनेसाठी सारंकाही झुगारुन काम करू लागलो. शिवसेनेला कुटुंब मानलं आणि आज माझा बाप काढला जातोय"
- एकनाथ शिंदे
04 Jul, 22 03:13 PM
अन्यायाविरुद्ध बंड करणं ही बाळासाहेबांचीच शिकवण आहे- एकनाथ शिंदे
04 Jul, 22 03:13 PM
शिवसेना वाचविण्यासाठी लढून शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही असं ठरवलं आणि निर्णय घेतला- एकनाथ शिंदे
04 Jul, 22 02:10 PM
आदित्य ठाकरेंचा महाराष्ट्र दौऱ्याचा रेकॉर्ड काढून पाहा, माझ्या मतदार संघात आले नाहीत. पण एकनाथ शिंदे पाच-पाच वेळा आले आणि अशा माणसाला तुम्ही पदासाठी गेलात अशी नावं ठेवता- गुलाबराव पाटील
04 Jul, 22 02:08 PM
आजही आमची उद्धव ठाकरेंना विनंती आहे, डोळ्यावरची पट्टी काढा आणि आजूबाजूच्या चार माणसांना दूर करा- गुलाबराव पाटील
04 Jul, 22 02:01 PM
शिवसेना संपतेय हे दिसत असल्यानंच हे पाऊल उचललं. आम्ही बंड केलेलं नाही उठाव केला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमचा पक्ष एक नंबरला होता. आता दोन वर्षात आम्ही चार नंबरला गेलो- गुलाबराव पाटील
04 Jul, 22 01:39 PM
बाळासाहेब म्हणाले होते कधीच काँग्रेससोबत जाणार नाही, मग वचन कुणी मोडलं? सुधीर मुनगंटीवार यांचा टोला
04 Jul, 22 01:34 PM
गेल्या दीड वर्षात मंत्रालयात नोटा छपाईचा कारखाना सुरू होता- सुधीर मुनगंटीवार
04 Jul, 22 01:30 PM
कार्यकर्त्यांनी काय फक्त झेंडे मिरवायचे का?, सुधीर मुनगंटीवारांचा शिवसेनेला टोला
04 Jul, 22 01:29 PM
प्रताप सरनाईक यांचं प्रत्युत्तर!
विधानसभेत प्रताप सरनाईक यांचं भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर. "तुमचं अभिनंदन करतो. तुम्हाला आज माझ्याबद्दल जे वाटतंय ते दीड वर्षापूर्वी वाटल असतं तर मला बरं वाटलं असतं", असं प्रताप सरनाईक म्हणाले.
04 Jul, 22 01:27 PM
संजय राठोडांना घालविण्यासाठी तुम्ही आंदोलन केलं, आता त्यांच्यासाठी काय करताय?, भास्कर जाधव यांचा सवाल
04 Jul, 22 01:26 PM
प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांना ईडी चौकशी लावली आज त्यांच्याच घराखाली केंद्रीय सुरक्षा लावली हा नियतीचा न्याय आहे- भास्कर जाधव
04 Jul, 22 12:23 PM
देवेंद्र फडणवीसांच्या भाषणात नेहमीप्रमाणे जोशपूर्ण दिसलं नाही, अजित पवारांचा टोला
04 Jul, 22 12:22 PM
एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत ते वारंवार का सांगावं लागत आहे?, अजित पवार यांचा टोला
04 Jul, 22 12:22 PM
गेल्या अडीच वर्षात फडणवीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेही झालेत- अजित पवार
04 Jul, 22 12:17 PM
होय राज्यात 'ईडी'चंच सरकार- देवेंद्र फडणवीस
"आमचे आमदार उभे राहिले तेव्हा विरोधीपक्षातून काहींनी ईडी, ईडी म्हणून आरडा ओरडा केला. पण मी त्यांना सांगू इच्छितो. होय हे ईडीचं सरकार आहे. ही ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र"
- देवेंद्र फडणवीस
04 Jul, 22 12:16 PM
आम्हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सच्च्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवू हे मोदींनी ठरवलं होतं. ते आम्ही करुन दाखवलं याचा अभिमान आहे- देवेंद्र फडणवीस
04 Jul, 22 12:14 PM
"पक्षानं मला घरी बसण्याचा आदेश दिला असता तर...", फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
"अनेकांनी मी उपमुख्यमंत्री झालो म्हणून टीका केली. पण पक्षानं आदेश दिला आणि मी त्याचं पालन केलं. खरंतर पक्षानं मला उपमुख्यमंत्री काय, जर घरी बसण्याचा आदेश जरी दिला असता तरी मी तो मान्य केला असता. मी अतिशय स्पष्टपणे सांगतो की मी एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी मी पूर्ण ताकदीनं उभा आहे. त्यांच्यात आणि माझ्यात दुरावा दिसणार नाही. कुरघोडीचं राजकारण दिसणार नाही. आमच्यातली मैत्री नेहमी कायम राहील"
- देवेंद्र फडणवीस
04 Jul, 22 12:01 PM
एकनाथ शिंदेंनी महालक्ष्मी एक्स्प्रेस पुराच्या पाण्यात अडकलेली असताना स्वत:चा जीव धोक्यात टाकून अनेकांना वाचवलं आहे आणि हे टेलिव्हिजन पत्रकारांनीही स्वत: अनुभवलं आहे- देवेंद्र फडणवीस
04 Jul, 22 12:01 PM
दिवसाला ४०० ते ५०० लोकांना भेटल्याशिवाय एकनाथ शिंदेंचा दिवस जात नाही- देवेंद्र फडणवीस
04 Jul, 22 12:00 PM
एकनाथ शिंदे २४ तास काम करणारा माणूस असून समृद्धी महामार्गाच्या कामात ते स्वत: फिल्डवर जाऊन समस्या सोडवत होते- देवेंद्र फडणवीस
04 Jul, 22 11:52 AM
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शिंदेंच्या अभिनंदनाचा प्रस्ताव
विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यात देवेंद्र फडणवीस भाषण करत आहेत. शिंदेंच्या आजवरच्या प्रवासाची आठवण फडणवीस यांनी करुन देत आहेत.
04 Jul, 22 11:50 AM
शिंदे सरकारच्या विरोधात ९९ मतं
शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाविरोधात ९९ मतं पडली आणि १६४ मतांच्या बहुमतानं शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला
04 Jul, 22 11:28 AM
शिंदे सरकारनं बहुमताचा आकडा गाठला
शिंदे सरकारनं बहुमत चाचणीत तब्बल १६४ मतं मिळवली आहेत.
04 Jul, 22 11:15 AM
बहुमत चाचणीला सुरुवात
शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीला सुरुवात झाली असून शिरगणतीद्वारे आमदारांची संख्या मोजण्यात येत आहे.
04 Jul, 22 10:55 AM
शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात, संतोष बांगर थेट शिंदेंच्या बसमध्ये!
जे संतोष बांगर कालपर्यंत शिवसेनेत होते...बंडखोरांचे पुतळे जाळले होते आणि उद्धव ठाकरेंसाठी रडले होते तेच आज एकनाथ शिंदे गटात सामील झालेत.
04 Jul, 22 10:12 AM
पवार जे बोलतात त्याचं नेमकं उलट होतं- प्रवीण दरेकर
शरद पवारांनी येत्या सहा महिन्यात राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं भाकित केल्यानंतर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार जे बोलतात त्याचं नेमकं उलट होत असतं हा इतिहास आहे. त्यामुळे हे सरकार पुढील १० वर्ष राहील, असं म्हणाले.
04 Jul, 22 10:09 AM
शिंदे सरकार आल्यानंतर जनता आनंदी आहे- प्रवीण दरेकर
04 Jul, 22 10:05 AM
विधीमंडळ अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस
विधीमंडळाच्या अधिवेशाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला थोड्याच वेळात सुरूवात होईल. यासाठी सर्वपक्षीय नेते विधान भवनात पोहोचण्यास सुरूवात झाली आहे.
04 Jul, 22 09:41 AM
भाजपाला फक्त शिवसेना फोडायची होती ती त्यांनी फोडली. भाजपाने केलेली ही तात्पुरती तजवीज आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
04 Jul, 22 09:40 AM
गुजरातसोबत महाराष्ट्रातही निवडणुका होऊ शकतात अशी माझी माहिती आहे. देशाचं राजकारण रक्तरंजित होत चाललं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
04 Jul, 22 09:39 AM
पवारांच्या भाकिताप्रमाणे मध्यावधी निवडणुका होतील- संजय राऊत
शरद पवार जे बोललेत ते खरं होऊ शकतं. राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असं संजय राऊत म्हणाले.
04 Jul, 22 09:15 AM
पहिला डाव एकनाथ शिंदेंचा, आज खेळ विश्वासाचा; विधानसभा पुन्हा गाजणार
04 Jul, 22 08:30 AM
एकनाथ शिंदे गट आणि भाजपाकडून रणनिती तयार
04 Jul, 22 08:30 AM
शिंदे सरकारची आज बहुमत चाचणी
दोन दिवसीय विशेष अधिवेशनात आज एकनाथ शिंदे सरकारला विश्वासदर्शक ठराव संमत करावा लागणार आहे. यासाठी एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.