CM Eknath Shinde Floor Test Live: विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पहिली लढाई शिंदे सरकारने जिंकली आणि भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर 164 मतांनी अध्यक्षपदी विराजमान झाले. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी राज्यसभा निवडणुकीत झालेल्या शिवसेनेच्या पराभवामागे देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचे म्हटले.
फणडवीसांनी सारा गेमचं पालटलायावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, इकडे सगळं घडवणारे हे(देवेंद्र फडणवीस) आहेत. राज्यसभेचे आमचे दोन उमेदवार होते. आमचे दोन्ही निवडून येणार होते, आम्ही फूल फिल्डिंड लावली होती. बाळासाहेब थोरात म्हणाले होते आम्ही 42 घेतो, त्यांना आम्ही म्हणालो 42चं घ्या, 44 घेऊ नका, नंतर पुढे अडचण येईल. पण, नंतर त्यांनी 44 घेतली आणि अजित पवारांनी 43 घेतली. तरीदेखील आमची जागा आली असती, पण नंतर साला आमचा माणूस पडला. फडणवीसांनी सारा गेमच पालटला. हे वाक्य म्हणताच, सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी शिंदेंनी साला शब्द परत घेतला, पण जयंत पाटील उठून म्हणाले की, जे चालू आहे, चालू द्या. जे नैसर्गिक आहे, ते झालंच पाहिजे.
संजय राऊतांना टोलायावर एकनाथ शिंदेंनी टोला लगावत म्हणाले की, आम्ही नैसर्गित युतीच केली आहे. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, राज्यसभेत आमची सर्व मते आम्हाला मिळाली होती. मग फुटले कोणाचे, हे अजून कळत नाहीये. या निवडणुकीचे खरे कलाकार इथे बसले आहेत. त्यांनी कोणाची मते फोडली कोणालाच माहित नाही. काहीजण म्हणत होते, पडला तो वेगळा पडला, दुसरा पडला पाहिजे. यावरही सभागृहात जोरदार हशा पिकला. यावेळी शिंदे यांनी नकळत संजय राऊत यांना टोला लगावला.