CM Eknath Shinde Floor Test Live: पवार जे बोलतात त्याच्या नेमकं उलट होत असतं, त्यामुळे शिंदे सरकारला धोका नाही- प्रवीण दरेकर
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 08:28 AM2022-07-04T08:28:08+5:302022-07-04T10:12:41+5:30
CM Eknath Shinde Floot Test Live: विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पहिली लढाई शिंदे सरकारनं जिंकली
CM Eknath Shinde Floor Test Live: विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पहिली लढाई शिंदे सरकारनं जिंकली आणि भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर १६४ मतांनी अध्यक्षपदी विराजमान झाले. तर शिवसेनेच्या राजन साळवी यांना १०७ मतं पडली. आज शिंदे सरकारची सर्वात मोठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. कारण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सभागृहात बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे.
विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात येणार असून यात शिंदे सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागेल. यात शिवसेना पक्षाकडून काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोन व्हिप काल जारी करण्यात आले होते. विधानसभेच्या कामकाजाच्या पटलावर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशा दोघांच्याही व्हिपची नोंद करण्यात आली होती. काल रात्री उशिरा नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांनी ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली नियुक्ती योग्य असल्याचं मान्य केलं आहे. तसंच शिवसेना विधीमंडळाचे प्रतोद म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू आणि गटनेते अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.
CM Eknath Shinde Floor Test Live Updates:
LIVE
10:55 AM
शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात, संतोष बांगर थेट शिंदेंच्या बसमध्ये!
जे संतोष बांगर कालपर्यंत शिवसेनेत होते...बंडखोरांचे पुतळे जाळले होते आणि उद्धव ठाकरेंसाठी रडले होते तेच आज एकनाथ शिंदे गटात सामील झालेत.
VIDEO: शिवसेनेचे आमदार संजय बांगर हेदेखील इतर शिवसेना आणि सहयोगी आमदार यांच्या गटात सामील, काल रात्री उशिरा ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये दाखल pic.twitter.com/jxEUayf0Uq
— Lokmat (@lokmat) July 4, 2022
10:12 AM
पवार जे बोलतात त्याचं नेमकं उलट होतं- प्रवीण दरेकर
शरद पवारांनी येत्या सहा महिन्यात राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं भाकित केल्यानंतर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार जे बोलतात त्याचं नेमकं उलट होत असतं हा इतिहास आहे. त्यामुळे हे सरकार पुढील १० वर्ष राहील, असं म्हणाले.
10:09 AM
शिंदे सरकार आल्यानंतर जनता आनंदी आहे- प्रवीण दरेकर
10:05 AM
विधीमंडळ अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस
विधीमंडळाच्या अधिवेशाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला थोड्याच वेळात सुरूवात होईल. यासाठी सर्वपक्षीय नेते विधान भवनात पोहोचण्यास सुरूवात झाली आहे.
09:41 AM
भाजपाला फक्त शिवसेना फोडायची होती ती त्यांनी फोडली. भाजपाने केलेली ही तात्पुरती तजवीज आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
09:40 AM
गुजरातसोबत महाराष्ट्रातही निवडणुका होऊ शकतात अशी माझी माहिती आहे. देशाचं राजकारण रक्तरंजित होत चाललं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
09:39 AM
पवारांच्या भाकिताप्रमाणे मध्यावधी निवडणुका होतील- संजय राऊत
शरद पवार जे बोललेत ते खरं होऊ शकतं. राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असं संजय राऊत म्हणाले.
08:30 AM
एकनाथ शिंदे गट आणि भाजपाकडून रणनिती तयार
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या उद्या दुसऱ्या दिवशी शिवसेना-भाजप युती सरकारला बहुमताच्या चाचणीला सामोरे जायचे आहे. यावेळी नक्की सरकारची रणनीती काय असेल यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. pic.twitter.com/qz4xSxqWgz
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 3, 2022
08:30 AM
शिंदे सरकारची आज बहुमत चाचणी
दोन दिवसीय विशेष अधिवेशनात आज एकनाथ शिंदे सरकारला विश्वासदर्शक ठराव संमत करावा लागणार आहे. यासाठी एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.