शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

“बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, उद्धव ठाकरे घरगडी समजतात”; CM शिंदेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 14:00 IST

CM Eknath Shinde News: उद्धव ठाकरे यांचे राम मंदिराचे प्रेम बेगडी आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.

CM Eknath Shinde News: आमदार अपात्रता प्रकरणाी निकाल आल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे कल्याण दौऱ्यावर असताना, शिंदे पिता-पुत्रांवर सडकून टीका केली. या टीकेबाबत प्रतिक्रिया विचारली असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच शब्दांत पलटवार केला. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, उद्धव ठाकरे घरगडी समजतात, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला.

कल्याणमध्ये काय होणार ? घराणेशाहीला विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचे तिकीट मोदीच कापतील. म्हणजे वापरा आणि फेका. हे धोरण. हे गद्दार कचऱ्याच्या टोपलीत जाणार. नाही गेले तर आपण आहोतच कचऱ्याच्या टोपलीत टाकायला. गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालण्यासाठी चाललो आहे. आपले माननीय पंतप्रधान महाराष्ट्रात आले होते. माझ्या माहिती प्रमाणे ते पुन्हा एकदा ते येणार आहेत. उद्या मकरसंक्रांत आहे.  तिळगूळ वाटप सुरु आहे. तिळगूळ घ्या गोडगोड बोला. या लोकसभेच्या निवडणुकीत हुकूमशाहीवर संक्रांत येणार, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. याला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. 

बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, उद्धव ठाकरे घरगडी समजतात

लोकशाहीत दौरा करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीची व्याख्या सांगावी. जे स्वतःचे  कुटुंब एकत्र ठेवू शकले नाहीत. ज्यांनी  केवळ माझे कुटुंब माझी जवाबदारी  पाहिली. ते यावर बोलत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या नेत्यांना, सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते. उद्धव ठाकरे यांनी  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. ते आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे राममंदिर उभारण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. उद्धव ठाकरे यांचे राममंदिराचे प्रेम बेगडी आहे. हेच म्हणायचे मंदिर वही बनायेंगे तारीख नहीं बतायेंगे. पण मोदींनी मंदिर पण तयार केले आणि तारीख पण जाहीर केली. राम मंदिर हा आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. तो राजकीय विषय होऊ शकत नाही. तसेच मोदी यांनी काळाराम मंदिर स्वच्छ केले तसेच मंदिरे स्वच्छ करण्याचे आवाहन केले, त्यानुसार राज्यातील मंदिर स्वच्छ करणे परिसर स्वच्छ केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, आम्ही जी डीप क्लीन मोहीम सुरु केली आहे. त्याने ठाण्यातील प्रदूषण कमी झाले आहे. या डीप क्लीन मोहिमेत समाजातील सर्व घटक  सहभागी होतात. यातून आम्हाला एक लोक चळवळ निर्माण करायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या स्वच्छ भारत मोहिमेतून याची प्रेरणा घेतली. स्वच्छ भारत अभियानाला जसा प्रतिसाद मिळत आहे. तसाच प्रतिसाद महाराष्ट्र मध्ये मिळतो. याने  प्रदूषण कमी होण्यास खूप परिणाम झाला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना